शेखर गोरेंची बहिणीला भाऊबीज! नगरपंचायतीत शिवसेनेच्या सुरेखा पखाले बिनविरोध

दहिवडी नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक एकमधून शिवसेनेच्या सुरेखा पखाले बिनविरोध निवडून आल्या आहेत.
Shekhar Gore with Sister Surekha Pakhale
Shekhar Gore with Sister Surekha PakhaleSarkarnama

दहिवडी : दहिवडी (Dahiwadi) नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक एकमधून शिवसेनेच्या (Shivsena) उमेदवार सुरेखा पखाले या नगरसेविका म्हणून बिनविरोध निवडून आल्या आहेत. शेखर गोरे (Shekhar Gore) यांनी बहिणीसाठी केलेल्या धावपळीला अखेर यश आले आहे. एकप्रकारे भावाने बहिणीला नगरसेविकापदाची भाऊबीज दिली आहे.

दहिवडी नगरपंचायतीच्या 17 पैकी 13 जागांची निवडणूक झाली असून, आता 4 जागांची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. नुकत्याच दहिवडीच्या नागरिक व मतदार झालेल्या सुरेखा पखाले यांनी प्रभाग क्रमांक एक व १७ मधून शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामुळे निवडणुकीत रंगत आली होती. यानंतर बहिणीला निवडून आणण्याचा चंग बांधलेल्या शेखर गोरे यांनीही प्रचारात उडी घेतली होती.

Shekhar Gore with Sister Surekha Pakhale
सायनाच्या वडिलांनी सिद्धार्थला इशारा दिला अन् म्हणाले...

शेवटी निवडणूक टाळून बहिणीला बिनविरोध निवडून आणण्यासाठी शेखर गोरेंनी हालचाली सुरू केल्या. शेखर गोरे यांच्या पडद्यामागून सुरु असलेल्या हालचालींना यश येऊन काल (ता. १०) भाजपच्या वंदना कटपाळे व काँग्रेसच्या कांता पोळ यांनी उमेदवारी माघारी घेतली. माघारीसाठी सुरवातीला टाळाटाळ करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रियांका पोळ यांनीही आज उमेदवारी अर्ज माघारी घेतला.

Shekhar Gore with Sister Surekha Pakhale
धक्कादायक : लॉकडाऊनमध्येच ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या घरी दारू पार्टी

विरोधातील सर्वच उमेदवारांनी माघार घेतल्याने सुरेखा पखाले या बिनविरोध नगरसेविका झाल्या आहेत. त्यांना शिवसेनेच्या पहिल्या बिनविरोध नगरसेविका होण्याचा मान मिळाला आहे. सुरेखा पखाले यांची बिनविरोध निवड झाल्याने कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com