नारायण पाटलांच ठरलं : उद्धव ठाकरे नाही तर आता शिंदे हेच आपले नेते!

Narayan Patil|Eknath Shinde : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंड केलेल्या आमदारांची भूमिका लक्षात घेऊन भाजपबरोबर सत्ता स्थापन करावी
Narayan Patil Latest News
Narayan Patil Latest News Sarkarnama

करमाळा : करमाळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी होय, मी एकनाथ शिंदे साहेब यांच्या सोबतच आहे, असे सांगितले आहे.सध्या शिवसेनेत अंतर्गत बंडाळी सुरू असताना पाटील (Narayan Patil) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटासोबत असल्याचे जाहीर केल्याने सोलापूर जिल्ह्यात शिवसेनाला (Shivsena) हा मोठा झटका समजला जात आहे. (Narayan Patil Latest Marathi News)

Narayan Patil Latest News
शिवसेनेत पहिला उठाव कुणी केला हे बंडखोर आमदार गोगावलेंनी नाव घेऊनच सांगितले...

2014 मध्ये नारायण पाटील शिवसेनेकडून निवडून आले होते. 2014 ते 2019 या पाच वर्षात त्यांनी मोठ्या प्रमाणावर विकास निधी खेचून आणला होता. विद्यमान आमदार असल्याने शिवसेनेकडुन त्यांची उमेदवारी फिक्स समजली जात असताना अगदी शेवटच्या दोन महिन्यांत राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. रश्मी बागल यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार प्रा. तानाजी सावंत यांच्या माध्यमातून शिवसेनेची उमेदवारी देण्यात आली. यावेळी पाटील यांनाच उमेदवारी द्यावी,असा आग्रह मातोश्रीवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, तालुकाप्रमुख सुधाकर लावंड, शहर प्रमुख प्रविण कटारिया यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी धरला होता. माञ त्याचा काही उपयोग झाला नव्हता. यावेळी पाटील यांना राष्ट्रवादीसह अन्य पक्षाकडून ऑफर असतानाही त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. परंतू त्यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला होता. तर शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार रश्मी बागल यांच्या पेक्षा साधारणपणे 25 हजार मतदान जास्त घेतले. त्यानंतर ते शिवसेनेवर नाराज होते. मात्र त्यांनी शिवसेना सोडली नव्ह्ती एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ते आपली कामे करत होते.

Narayan Patil Latest News
बहुमत चाचणी होणार? सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तीवाद; पाच वाजता होणार फैसला

दरम्यानच्या काळात प्रा. तानाजी सावंत यांनी उमेदवारीबाबत झालेली चूक लक्षात घेतली असल्याचे समजते. शिवसेना आमदारांच्या बंडानंतर नारायण पाटील यांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. करमाळा पंचायत समिती शिवसेनेची पहिल्यांदाच सत्ता पाटील यांनी आणली एवढेच नव्हे तर मोहिते पाटील यांच्या मदतीने सोलापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्षही पहिल्यांदाच शिवसेनेचा केला. आजही सोलापूर जिल्ह्यात नारायण पाटील हे मोहिते पाटील यांचे नेतृत्व मानतात. याबाबत बोलताना पाटील यांनी ‘मी एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबतच आहे’ माञ पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याविषयी मला आजही आदर आहे. परंतू त्यांनी बंड केलेल्या आमदारांची भूमिका लक्षात घेऊन भाजपबरोबर सत्ता स्थापन करावी, असे वाटते, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Narayan Patil Latest News
मराठवाड्यातील काही बंडखोर सेनानेत्यांची राजकीय कारकिर्द संपू शकते...

सेना -भाजपचे सरकार असताना केंद्रीय मंञी नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून करमाळा विधानसभा मतदारसंघात कोट्याचा निधी आणता आला. पाटील पुढे बोलताना म्हणाले, ‘काँग्रेस व राष्ट्रवादीकडून शिवसेनेला डावलण्याचे काम झाले. शिवसेनेतून एवढ्या आमदारांनी बंडखोरी का केली? यावर बोलताना त्यांनी शिंदे यांच्या भूमिकेचे त्यांनी समर्थन केले आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांना वेळोवेळी मदत केली आहे. शिवसेनेतील आमदारांना अडी- अडचणीच्या काळात साथ दिल्यामुळे आमदार व मंत्री शिंदे यांच्या पाठीशी आहेत. शिवसेनेतून बंडखोरी झाली ही गोष्ट वाईट असली तरी शिवसेनेतील काही वरिष्ठ नेत्यांना ही आमदारांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शिवसेनेतील आमदार नाराज होते. पक्षनेतृत्वाने वेळीच लक्ष दिले असते तर शिवसेनेवर ही वेळ आली नसती. आमदारांच्या निधीबद्दल आणि त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांबद्दल काही वरिष्ठ मंडळीकडून दुर्लक्ष करण्यात आले. पक्षाच्या आमदाराकडे लक्ष दिले नसल्यामुळेच ही बंडखोरी झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com