जगतापांशी न जुळल्याने शिवतारेंचीही उडी; शिंदे गटात दाखल होणारे तिसरे माजी आमदार

Shivsena | BJP |Vijay Shivtare : आजी आमदारांसह माजी आमदारांचाही शिंदेंना पाठिंबा...
Vijay Shivtare-Sanjay Jagtap
Vijay Shivtare-Sanjay JagtapSarkarnama

पुणे : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील (Shivsena) अनेक आजी-माजी पदाधिकारी उघडपणे नाराजी व्यक्त करू लागले आहे. अनेकांनी शिंदे गटात जाणे पसंत केले आहे. अशात पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनीही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेवून याबाबतची भूमिका स्पष्ट केली. तालुक्यातील विकास कामे होत नाहीत, त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबतची युती तोडावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच ५६ वर्षांची स्वाभिमानी शिवसेना संजय राऊत यांनी बारामतीच्या दावणीला लावली, अशी सडकून टीकाही त्यांनी केली.

राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होवून सरकार होते. मात्र तरीही पुरंदरमध्ये २०१९ रोजी निवडून आलेल्या काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांच्याशी विजय शिवतारे यांचे सूत एक दिवसही जुळले नाही. सातत्याने दोघांमध्ये खटके उडत राहिले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही दोघांनीही वेगळी भूमिका घेतलेली पाहायला मिळाली. अशातच २०२४ च्या निवडणुकांमध्येही आघाडी झाल्यास आघाडी धर्मानुसार पुरंदरची जागा काँग्रेसच्या वाट्याला जाणारे नक्की होते. त्यामुळेच शिवतारे यांनी वेगळी भूमिका घेत शिंदे गटाला पाठिंबा दिला असल्याचे जिल्ह्यातील राजकीय वर्तूळात बोलले जात आहे.

दरम्यान शिवतारे यांच्यासारखीच भूमिका घेत कोल्हापूर उत्तरचे शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि सोलापूरमधील करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील (Narayan Patil) हेही शिंदे गटात सामील झाले आहेत. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीमध्ये मतदारसंघ काँग्रेसकडून पुन्हा शिवसेनेकडे घ्यावा अशी मागणी क्षीरसागर यांनी केली होती. २०१९ साली त्यांचा पराभव होण्यापूर्वी ते याच मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते.

मात्र त्यानंतरही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही जागा कोल्हापूरचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या आग्रस्तव शिवसेनेकडे घेतली नाही, असा दावा करण्यात आला. तर नारायण पाटील हे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते. पण २१०९ मध्ये शिवसेनेने रश्मी बागल यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला. तेव्हापासून ते शिवसेनेत नाराज होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com