शिवसेनेच्या घोषणेनं काँग्रेस काळजीत; सतेज पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष

Kolhapur North Election 2022 : निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेस आग्रही
satej Patil-sanjay mandlik
satej Patil-sanjay mandlikSarkarnama

कोल्हापूर : कोल्हापुरमध्ये आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसने दिवंगत आमदार जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayshree Jadhav) यांचे नाव निश्चित केले आहे. त्यानुसार त्यांनी तयारीलाही सुरुवात केली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेस आग्रही आहे.

पण त्याचवेळी महाविकास आघाडीतील शिवसेनेनेच (Shivsena) जिल्हा बँकेत चांगली कामगिरी केल्यानंतर या जागेवर निवडणूक लढवण्यासाठी दंड थोपटले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या (Congress) चिंतेत भर पडली आहे. आमचा हट्ट किंवा आग्रह समजा पण शिवसेनेने 'उत्तर'ची जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे, असे खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी स्पष्ट केले. शिवसेनेच्या या निर्णयानंतर आता जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते सतेज पाटील (Satej Patil) यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

satej Patil-sanjay mandlik
सत्यजित पाटणकरचं बॉस! शंभूराजेंना पाणी पाजत राष्ट्रवादीने राखला गड

कोल्हापूर 'उत्तर' विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत काल खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला आमदार प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि शिवसेनेचे जिल्ह्यातील सर्व माजी आमदार या बैठकील उपस्थित होते. याच बैठकीनंतर कोल्हापूर उत्तरची जागा शिवसेना कोणत्याही परिस्थितीमध्ये लढवणार असल्याचे संजय मंडलिक यांनी सांगितले.

संजय मंडलिक म्हणाले, 'कोल्हापूर उत्तर' हा मतदारसंघ पारंपारिकपणे शिवसेनेकडे राहिलेला आहे. यापुर्वीचे इथले सर्वाधिक आमदार शिवसेनेचेच राहिले आहेत. त्यामुळे या ठिकाणी होत असलेली पोटनिवडणुक शिवसेनेने लढवावी असा निर्णय सर्वांच्या उपस्थितीत घेण्यात आला आहे. हा निर्णय आम्ही आता मातोश्रीकडे कळविणार असून मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याबाबतचा अंतिम निर्णय घेणार आहेत.

satej Patil-sanjay mandlik
महेश शिंदेंनी मारलं कोरेगावचं मैदान; शशिकांत शिंदेंचा सलग तिसरा पराभव

'कोल्हापूर उत्तर'चे आमदार चंद्रकांत जाधव यांचे मागील महिन्यात १ डिसेंबर रोजी निधन झाले आहे. त्यानंतर ५ राज्यांच्या निवडणुकीसोबत इथेही पोटनिवडणूक पार पडणार आहे. पण आमदार जाधव यांचे आकस्मिक निधन झाल्याने महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृती आणि परंपरेप्रमाणे ही निवडणूक बिनविरोध व्हावी असे काँग्रेसचे (Congress) आवाहन आहे. मात्र आता भाजप पाठोपाठ शिवसेनेनेही ही या जागेवरील निवडणूक लढवण्याचे संकेत दिल्याने काँग्रेसच्या चिंतेत भर पडली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com