सावंतांनी रूग्णालयाला भेट दिली अन् शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं

Tanaji Sawant : '५० खोके - एकदम ओके', अशा घोषणाही दिल्या.
Yuva Sena
Yuva Sena Sarkarnama

सोलापूर : राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सोलापूर मधील नातेपुते आणि माळशिरस ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी तेथील डॉक्टरांना रुग्णालयातील गैरसोयीबद्दल सुनानले. मा्त्र ही भेट घेऊन निघून गेल्यानंतर, तेथील युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तानाजी सावंत यांच्याविरोधात रुग्णालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर रुग्णालयात जाऊन त्यांनी गोमूत्र शिंपडले व रुग्णालयाचे शुद्धीकरण केले. सरकारविरूद्ध ५० खोके - एकदम ओके, अशा घोषणाही दिल्या.

राज्यात सत्तांतर झाल्यापासून विरोधी पक्ष, शिवसेना अस्वस्थ आहेत. शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी बंडखोरी करून नवा गट स्थापन केला. तेव्हापासून याबाबत सतत टिका होत होती. शिंदे गटातील मंत्र्याबाबत सामान्य शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये याचे पडसाद म्हणजे उमटत आहेत. काही दिवसांपूर्वी मंत्री दादा भुसे यांच्याविरोधात शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. भुसे यांच्यासमोरच शेतकऱ्यांनी ५० खोके - एकदम ओके अशा घोषणा दिल्या होत्या.

Yuva Sena
तुमचा त्रास कमी झाला का? राम शिंदेंच्या प्रश्नाने हर्षवर्धन पाटलांना हसू अनावर
Yuva Sena
Dr. Neelam Gorhe : उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवा !

तानाजी सावंत हे सातत्याने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टिका करत आहेत. यामुळे शिवसेनेकडून त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in