शिवेंद्रसिंहराजेंनी प्रयत्न केले; पण, मी जावळीत लक्ष घालणार....

जावळीतील Jawali जनता १०० टक्के माझ्या पाठीशी आहे, असे सांगून आमदार शिंदे Shashikant shinde म्हणाले, काही स्वार्थी लोक आहेत, ते गेले. आम्ही पुन्हा येथे राष्ट्रवादीची Nationalist congress ताकद उभी करु.
शिवेंद्रसिंहराजेंनी प्रयत्न केले; पण, मी जावळीत लक्ष घालणार....
Shashikant shinde, shivendraraje Bhosalesarkarnama

सातारा : जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी मी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यातून कोणाच्या भावना दुखवल्या जात असतील तर माझा नाईलाज आहे. यापूर्वी जावळीत मी लक्ष घातले नव्हते. परंतु आता जावळीत राष्ट्रवादीची ताकद वाढविण्याकरिता आता मी स्वतः लक्ष घालणार असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी नमूद केले. दरम्यान भाजप आमदार शिवेंद्रसिंहाराजे भोसले यांनी माझ्यासाठी प्रयत्न केल्याचे शिंदेंनी नमूद केले.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी आज (रविवार) अकरा तालुक्यांत मतदानाची प्रक्रिया सुरु आहे. जावळीत आमदार शिंदे गट व प्रतिस्पर्धी रांजणे गट यांच्यात वादावादी झाला. पोलिसांच्या आवाहनानंतर तणाव निवळला.या सर्व पार्श्वभूमीवर आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, प्रतिस्पर्धी उमेदवार ज्ञानदेव रांजणे हे तांत्रिकदृष्टया राष्ट्रवादीत आहेत. अन्य सर्व लोकांना ते माहित आहेत. मतदान प्रक्रियेच्या काळात फार मोठा राडा झाला नाही. केवळ बाचाबाची झाली. नंतर ती आम्ही मिटवली.

Shashikant shinde, shivendraraje Bhosale
शशीकांत शिंदेंसाठी शरद पवारांचा शिवेंद्रसिंहराजे, मकरंद पाटलांना फोन...

आता मी जावळीत लक्ष घालणार आहे. मी अजूनपर्यंत जावळीत लक्ष घातले नव्हते. आता या पुढे लक्ष घालीन. जावळीतील जनता १०० टक्के माझ्या पाठीशी आहे, असे सांगून आमदार शिंदे म्हणाले, काही स्वार्थी लोक आहेत, ते गेले. आम्ही पुन्हा येथे राष्ट्रवादीची ताकद उभी करु. माझे भाग्य आहे की जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच जिल्हाभरातील सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माझ्या विजयासाठी प्रयत्न केले आहेत.

Shashikant shinde, shivendraraje Bhosale
शशीकांत शिंदेंचे टेन्शन शिवेंद्रसिंहराजे दूर करणार...

शिवेंद्रसिंहराजेंनी ही प्रयत्न केले, असे सांगून ते म्हणाले, ज्येष्ठ नेत्यांनी सांगूनही काहींनी ऐकले नाही. त्याचा योग्य वेळीस खूलासा केले जाईल. मी पक्षाचा एकनिष्ठ आहे. माझ्या पक्षासाठी मी लढत राहतो. सामान्य जनता आणि कार्यकर्त्यांची नाळ माझ्याशी जोडली गेली आहे. भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तुमच्यासाठी प्रयत्न केला का, याविषयी ते म्हणाले, त्यांना मानणा-या कार्यकर्त्यांनी त्यांचे का ऐकले नाही, याचा उलगडा होत नाही. त्यांनी प्रयत्न केला ही वस्तुस्थिती आहे. प्रयत्न केल्याने लोक मानत नसतील तर उद्याचा संघर्ष हा त्या लोकांबरोबर असेल, त्यांनी नमुद केले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in