दोन राजेंच्या भेटीने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण

Sambhajiraje Chhatrapati| Shivsendraraje Bhosale| काही दिवसांपूर्वी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संभाजीराजे छत्रपतींचा ठरवून गेम केल्याचं वक्तव्य केलं होतं
दोन राजेंच्या भेटीने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण
Sambhajiraje Chhatrapati| Shivsendraraje Bhosale|

latest Political news

सातारा : राज्यसभेच्या उमेदवारीवरून राज्यात राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले होते. त्यातच संभाजीराजें छत्रपती यांच्यावर टीका करत श्रीमंत शाहू महाराजांनी छत्रपती यांनी शिवसेनेची (Shivsena) बाजू घेतल्याने आता नवा वाद सुरु झाला आहे. ( Sambhajiraje Chhatrapati and Shivsendraraje Bhosale visit news)

तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कोल्हापुर दौऱ्यात शाहू महाराजांची भेट झाली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी फोनवरुन चर्चाही केली. याच दरम्यान आता आणखी एका भेटीमुळे चर्चांना सुरु झाल्या आहेत. अशातच आता संभाजीराजे छत्रपती आणि आणि शिवेंद्रसिंहराजे यांची साताऱ्यात भेटीची बातमीही समोर आली आहे. राष्ट्रीय महामार्गावर खिंडवाडी येथे ही धावती भेट झाली. यामुळे भविष्यात दोन्ही राजे एकत्र येऊन राज्याच्या राजकारणात लक्ष घालणार की काय, अशाही चर्चा सुरु झाल्या आहेत.

Sambhajiraje Chhatrapati| Shivsendraraje Bhosale|
किक्रेटनामाच्या पहिल्या चषकावर राष्ट्रवादीचे नाव; प्रशांत जगताप-अनिकेत तटकरे ठरले विजयाचे शिल्पकार

काही दिवसांपूर्वी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संभाजीराजे छत्रपतींचा ठरवून गेम केल्याचं वक्तव्य केलं होतं. यावर संजय राऊत आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवेंद्रसिंहराजेंना आगीत तेल ओतू नये, अशा शब्दांत प्रत्युत्तर दिलं होतं.

दरम्यान. संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या फेसबुक पेजवरही या भेटीची माहिती दिली आहे. ''आज प्रवासादरम्यान आमचे बंधू छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची अचानक भेट झाली.महामार्गावर असून सुध्दा गाडी ओव्हरटेक करून त्यांनी भेट घेतली व आपुलकीने चौकशी केली. आनंद वाटला. कोल्हापूर व सातारा छत्रपती घराण्याचे ऋणानुबंध असेच राहोत, हीच आई भवानी चरणी प्रार्थना !''अशा भावना संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी नाकारल्यानंतर श्रीमंत शाहू महाराज यांनी आपली प्रतिक्रीया दिली. ''संभाजीराजे छत्रपती यांनी राजकारणात घेतलेले सर्व निर्णय हे त्यांचे वैयक्तिक आहेत. पण. शिवसेना काही कारणाने संभाजीराजे यांना उमेदवारी देऊ शकली नाही. याचा छत्रपती घराण्याशी काहीही संबंध नाही. तरीही ते असे चुकीचे संबंध जोडत असतील तर ते चुकीचचं आहे, अस निर्वाळा श्रीमंत शाहू महाराज यांनी दिला.

शिवसेनेचं राज्यसभेच्या उमेदवारीबाबत आधीच काही गोष्टी ठरल्या होत्या पण ही उमेदवारी काही कारणांनी ते जर उमेदवारी देऊ शकले नसतील तर त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शब्द न पाळल्याची टीका होणेदेखील चुकीचे असल्याचे मत शाहू महाराजांनी व्यक्त केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in