मी भाजपचा आमदार पण अजितदादा मला भरपूर निधी देतात : शिवेंद्रसिंहराजेंकडून जाहीर कौतूक

Ajit Pawar | Shivendrasinharaje Bhosale : चर्चा शिवेंद्रसिंहराजे-अजित पवार यांच्या जवळीकतेची
deputy chief minister ajit pawar met bjp mla shivendra raje bhosale
deputy chief minister ajit pawar met bjp mla shivendra raje bhosaleSarkarnama

सातारा : राज्यात एका बाजूला भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा वाद सातत्याने सुरु आहे. मात्र साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे (Shivendrasinh Bhosle) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आपल्याला भरपूर निधी देतात असे म्हणतं त्यांचे जाहीर कौतुक केले आहे. सरताळे (ता. जावळी) येथे विकास सेवा सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या संचालकांच्या सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते.

आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, पावसाळ्यात जावळी तालुक्यातील खराब झालेल्या रस्त्यांची कैफियत अजित पवार यांच्यासमोर मांडली होती. मात्र मी भाजपमध्ये असतानाही त्यांनी जावळी तालुक्याच्या रस्त्यांसाठी तात्काळ २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. ही बाब तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्यामुळे मी भाजपचा आमदार असलो तरी काळजी करू नका. अजित दादांकडून मला नेहमीच विकासकामांसाठी मोठं सहकार्य मिळतं. विकासकामांत राजकारण आजपर्यंत कधीही आडवं आलेलं नाही.

deputy chief minister ajit pawar met bjp mla shivendra raje bhosale
भाजप आमदार जयकुमार गोरे यांना हायकोर्टाचा दणका: अटक होण्याची शक्यता

२५ कोटी रुपयांचा निधी म्हणजे शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये आहेत, तालुक्याचा विकास होणार नाही, असे सांगून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या विरोधकांना ही एक प्रकारे चांगली चपराक आहे, असा टोलाही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचं नाव न घेता लगावला.

deputy chief minister ajit pawar met bjp mla shivendra raje bhosale
नाना पटोले तोंडाची वाफ घालवण्या पलिकडे काहीही करू शकत नाहीत; दरेकरांचा टोला

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमाच्या दौऱ्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री पवार यांनी विशेष करून मी जिथे उपस्थित नव्हतो, त्या ठिकाणी माझ्या नावाचा उल्लेख करून माझ्या कार्याबाबत कौतुक केले, हे माझ्यासाठी खूप मोठे आहे. विकासकामे करताना पक्षापेक्षा सर्वसामान्य जनतेची कामे महत्त्वाची असतात. म्हणूनच माझ्यासारखा आमदार काम करत आहे. त्याची पोचपावती सर्वसामान्य जनतेकडून मिळत आहे. त्यामुळे कोण मुंबईवरून येऊन इथं दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, त्यालाही सर्वसामान्य जनता उत्तर देईल. त्यामुळे अशा प्रवृत्तीकडे लक्ष देऊ नका, असेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com