शिवेंद्रसिंहराजेंचा विरोध कायम; उदयनराजेंचा निर्णय अजित पवारांच्या कोर्टात 

रात्री पुण्यात सभापती रामराजेंसोबत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी उदयनराजेंना सर्वसमावेशक पॅनेलमध्ये सामावून घेण्याची तयारी दर्शविली. मात्र, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आपला विरोध कायम ठेवला.
Ajit Pawar, Udayanraje, Shivendraraje Bhosale
Ajit Pawar, Udayanraje, Shivendraraje Bhosalefacebook

सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांना सर्वसमावेशक पॅनेलमध्ये सामावून घेण्यास राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तयारी दर्शवली आहे. मात्र, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अद्याप होकार दिलेला नाही. सभापती रामराजे यांनी काल पु्ण्यात केलेली मध्यस्थी अपयशी ठरली आहे. त्यामुळे आज सकाळी दहा वाजता होणाऱ्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यावर निर्णय करणार आहेत. त्यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची महत्वपूर्ण बैठक होणार आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिवस असून आज दुपारी तीन वाजता निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते आज सकाळी दहा वाजता पुन्हा चर्चेला बसून खासदार उदयनराजे भोसले यांचा प्रश्न सोडवणार आहेत. रात्री पुण्यात सभापती रामराजेंसोबत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी उदयनराजेंना सर्वसमावेशक पॅनेलमध्ये सामावून घेण्याची तयारी दर्शविली. मात्र, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आपला विरोध कायम ठेवला.

Ajit Pawar, Udayanraje, Shivendraraje Bhosale
संघर्ष मला नवीन नाही, कोणालाही घाबरु नका : शिवेंद्रसिंहराजे

त्यामुळे रामराजेंची मध्यस्थी अपयशी ठरली. राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांना त्यांचा निर्णय करता आलेला नाही. त्यामुळे आज साताऱ्यात पालकमंत्र्यांच्या उपस्थित बैठक होऊन याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार अंतिम निर्णय घेणार आहेत. त्यामुळे ते शिवेंद्रसिंहराजे यांची मनधरणी करतील त्यानंतरच उदयनराजेंचा सर्वसमावेशक पॅनेलमध्ये समावेश होऊन निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

Ajit Pawar, Udayanraje, Shivendraraje Bhosale
खासदार उदयनराजे राष्ट्रवादीचे चक्रव्यूह भेदणार...?

दुसरीकडे जावळी सोसायटी मतदारसंघातून आमदार शशीकांत शिंदेंच्या विरोधात अर्ज असलेले ज्ञानदेव रांजणे यांनी अर्ज माघार घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शशिकांत शिंदे यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून मध्यस्थी  होण्याची शक्यता आहे. तर कोरेगाव सोसायटीतून विद्यमान उपाध्यक्ष व राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील माने यांनाच पुन्हा संधी द्यावी असे खुद्द खासदार शरद पवार यांनी सूचना केलेली आहे. त्यामुळे आमदार शशीकांत शिंदेंनाही येथे नमते घ्यावे लागणार आहे.

Ajit Pawar, Udayanraje, Shivendraraje Bhosale
जळगाव जिल्हा बँक निवडणूक : महाविकास आघाडीला आता सर्वपक्षीय बंडखोरांचे आव्हान

आमदार गोरेची भूमिका आज ठरणार

माणचे आमदार जयकुमार गोरे यांची राष्ट्रवादीसोबत चाललेली गुप्त चर्चा फिस्कटली आहे. त्यामुळे ते आज दुसऱ्या पॅनेलच्या उमेदवारांची घोषणा करणार की अर्ज माघार घेतल्यानंतर करणार याची उत्सुकता आहे. ते सर्व मतदारसंघात उमेदवार देऊ शकणार का, याची उत्सुकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com