Satara Palika : उदयनराजेंच्या आघाडीवर शिवेंद्रसिंहराजेंची टीका.. म्हणाले, मलिदा लाटण्याचा प्रकार....

नागरिकांनी सातारा पालिकेत Satara Palika तक्रारी केल्यातरी त्याची दखल घेतली जात नाही. याला सातारा विकास आघाडीचे Satara Vikas Aghadi स्वच्छतेविषयीचे धोरण कारणीभूत आहे.
Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale sarkarnama

सातारा : शाहूनगर, शाहूपुरी, विलासपूर यासारख्या भागांत पावसामुळे प्रचंड अस्वच्छता वाढली आहे. कचरा उचलला जात नाही. त्यामुळे तत्कालिन सातारा विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मर्जीतल्या ठेकेदाराला टेंडर देऊन मलिदा लाटण्याचे जे प्रकार केले त्याचाच हा परिणाम आहे, अशी सडकून टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली

.

एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी हद्दवाढीच्या क्षेत्रात सातारा पालिकेचे कसे दुर्लक्ष होतेयं याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, गणपतीच्या काळात प्रचंड पाऊस होता. त्यामुळे रस्त्याची साईड पॅचिंग करण्यात आले नव्हते. मात्र, आता पाऊस थांबला आहे. रस्त्यांची कामे तत्काळ करून घ्यावीत.

Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
ऐतिहासिक राजवाड्याचा रूबाब कायम राहण्यासाठी तो आमच्या ताब्यात द्या... उदयनराजे

शाहुपूरी, शाहूनगर, विलासपूर येथे पावसामुळे प्रचंड गवत वाढले असून ठिकठिकाणी सार्वजनिक कचरा सुद्धा वाढला आहे. घंटागाडी कुठे कुठे वेळेवर येत नसल्यामुळे कचरा संकलनाची अडचण होत आहे. नागरिकांनी पालिकेत तक्रारी केल्यातरी त्याची दखल घेतली जात नाही. याला सातारा विकास आघाडीचे स्वच्छतेविषयीचे धोरण कारणीभूत आहे.

Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
कमिशनबाजीमुळे उदयनराजेंच्या आघाडीचा शंभर टक्के कडेलोट होणार... शिवेंद्रसिंहराजे

मर्जीतल्या ठेकेदाराला हट्टाने ठेका गेला पाहिजे आणि त्याच्याकडून त्या ठेक्याचे कमिशन मिळाले पाहिजे. या हट्टापोटीच हा ठेका जाणीवपूर्वक लांबवण्यात आला. त्याचेच परिणाम साताराला भोगावे लागत असून नागरिकांच्या जीवाशी हा एक प्रकारचा खेळ सुरू असल्याची कडवट टीका शिवेंद्रसिंहराजे यांनी केली. सध्या पालिकेत प्रशासक अभिजीत बापट यांचे प्रशासन आहे. त्यामुळे त्यांनी या प्रश्नांमध्ये तातडीने लक्ष घालून हद्दवाढीतल्या भागाची स्वच्छता आणि तेथील आरोग्य सुविधा याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com