Shivendraraje Bhosale News: नारळफोड्या गँगची अवस्‍था वाढप्‍यांसारखी : शिवेंद्रराजेंची टीका

राज्य शासनाने दिलेल्‍या निधीतून शाहूनगर, गोळीबार मैदान, विलासपूर, शाहूपुरी आदी भागांत रस्ते, गटार, पथदिवे आदी विकासकामांची सुरुवात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्‍थितीत झाली.
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosalesarkarnama

Satara News: सातारा पालिका (Satara Palika) हद्दवाढ भागात मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी राज्य शासनाकडून ४८ कोटी रुपये निधी मंजूर करून आणला. या निधीतून शाहूनगर, गोळीबार, विलासपूर, शाहूपुरी आदी भागांतील विकासकामे मार्गी लागणार आहेत. मात्र, याचे श्रेय आपल्याला मिळावे, म्हणून नारळफोड्या गँगने नारळ फोडण्याचा कार्यक्रम पार पडला. या गँगची अवस्था लग्नातील वाढप्यांसारखी झाली आहे, अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विरोधकांवर केली.

शासनाने दिलेल्‍या निधीतून शाहूनगर, गोळीबार मैदान, विलासपूर, शाहूपुरी आदी भागांत रस्ते, गटार, पथदिवे आदी विकासकामांची सुरुवात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्‍थितीत झाली. या वेळी फिरोज पठाण, नाना पवार, विजय देसाई, आशुतोष चव्हाण, व्यंकटराव मोरे आदींची उपस्थिती होती.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘‘निधी मिळून सहा महिने उलटले; पण काही लोकांनी मर्जीतल्या ठेकेदाराला टेंडर मिळावे, यासाठी निधी पाडून ठेवत कामे रखडवली. ज्यावेळी पालिकेत सत्ता होती. त्याकाळात हद्दवाढ भागासाठी सातारा विकास आघाडीने किती कामे केली? मी दुसऱ्याच्या कामाचे श्रेय कधीच घेत नाही.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Satara : खासदारांचे पेंटिंग हा बालिशपणाचा कळस; समर्थकांना आवर घाला : शिवेंद्रसिंहराजे

ग्रेडसेपरेरटचे काम त्‍यांनीच केले आणि ते किती चांगले आहे, हे लोकांना माहीत आहे. दुसऱ्यांनी मंजूर केलेल्या कामाचे नारळ फोडून उगाच शायनिंग करू नये.’’ आता तुमची वेळ संपली असून, सातारकर तुम्हाला घरी बसवतील, असा विश्‍‍वासही त्‍यांनी या वेळी व्‍यक्‍त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com