जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी शिवेंद्रसिंहराजेंनी घेतली शरद पवारांची भेट...

मुंबईत Mumbai सिल्व्हर ओकवर Silver Oak श्री. पवार यांची भेट घेऊन जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर पुन्हा संधी देण्याची मागणी केली. त्यामुळे शरद पवार Sharad Pawar शिवेंद्रसिंहराजेंच्या Shivendraraje विनंतीला मान्यता देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी शिवेंद्रसिंहराजेंनी घेतली शरद पवारांची भेट...
Shivendraraje Bhosale, Sharad Pawarsarkarnama

सातारा : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सध्या भेटीगाठीचे सत्र सुरू आहे. काल त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर पुन्हा संधी देण्याची मागणी केली होती. दरम्यान, आज सकाळी त्यांनी मुंबईत खासदार शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेऊन जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर पुन्हा संधी देण्याची मागणी केली. त्यामुळे शरद पवार शिवेंद्रसिंहराजेंच्या विनंतीला मान्यता देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीनंतर बँकेच्या अध्यक्ष पदावर संधी मिळावी म्हणून काही संचालकांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. यामध्ये वाईचे नेते नितीन लक्ष्मणराव पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. त्यासोबतच राष्ट्रवादीतून पाटणचे सत्यजितसिंह पाटणकर, महाबळेश्वरचे राजेंद्र राजपुरे हेही इच्छुकांच्या रेसमध्ये आहेत. त्यासोबतच विद्यमान अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हेही इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर काल (गुरूवारी) सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेतली होती.

Shivendraraje Bhosale, Sharad Pawar
जावळीतील दहशत मोडून काढण्यासाठीच रांजणे यांचा विजय आहे; शिवेंद्रसिंहराजे भोसले;पाहा व्हिडिओ

यावेळी शिवेंद्रसिंहराजेंनी मी बॅंकेच्या अध्यक्ष पदावर आगामी काळातही काम करण्यास इच्छुक असून मागील वेळी सर्वांना सोबत घेऊन बॅंकेचे कामकाज चांगल्या पध्दतीने केले आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा संधी द्यावी, अशी मागणी केली. यावेळी अजित पवार यांनी यासंदर्भात मी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी बोलून ठरवतो, असे सांगितले होते. आज दुसऱ्याच दिवशी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी सकाळी दहा वाजता भेट घेतली.

Shivendraraje Bhosale, Sharad Pawar
शिवेंद्रसिंहराजेंची विनंती अजित पवार स्वीकारणार की धुडकावणार...

यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी मी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी दुसऱ्यांदा इच्छुक असून मला पुन्हा संधी द्यावी, मागणी केली. यावेळी खासदार शरद पवार यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे कौतूक करताना कै. अभयसिंहराजे भोसले यांच्या पावलावर पाऊल ठेऊन वाटचाल करत आहात, असे गौरवोद्गार काढले.

Shivendraraje Bhosale, Sharad Pawar
सातारा बॅकेच्या अध्यक्षपदी शिवेंद्रराजे की नितीन पाटील ; तर्कविर्तकांना उधाण

यावर आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, जिल्हा बँकेत राजकारण नसल्याने बँक चांगली चालली आहे. मी सर्वांना बरोबर घेऊन वाटचाल केली होती. आता पुन्हा संधी दिली तर अध्यक्ष म्हणून काम करण्याची इच्छा आहे. त्यावर तुम्ही अजितला भेटला का, असे विचारले. त्यावर शिवेंद्रसिंहराजेंनी अजित दादांची कालच भेट घेतली असून यामध्ये बँकेविषयी सविस्तर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर मी अजित व रामराजेंशी बोलतो, असे शरद पवार यांनी सांगितले. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे यांचा दुसऱ्यांदा बँकेचे अध्यक्ष होण्याची शक्यता बळावली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.