वाढदिनी खर्च टाळत शिवेंद्रसिंहराजेंनी केला महाशिवपंचायतन महायज्ञ...

साताऱ्यातील Satara गांधी मैदानावर हा महायज्ञ Mahayagya संपन्न झाला असून यावेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले Shivendraraje Bhosale हे पत्नी वेदांतिकाराजेंसह Vedantikaraje Bhosale सहभागी झाले होते.
Mahayagya satara
Mahayagya satara pramod ingale, satara

सातारा : भाजपचे सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आज सातारा शहर आणि तालुक्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, कोरोना महामारीमुळे अनेकांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजेंनी राजकिय किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रम टाळत खर्चाला फाटा देत जगातील अशांतत व कोरोना महामारी निघून जावी यासाठी महाशिवपंचायतन महायज्ञ केला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून जगालाच कोरोना महामारीचा सामना करावा लागला होता. आता कुठे कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून लॉकडाउन पूर्ण शिथिल करण्यात आले आहे. युक्रेन व रशियात सुरू असलेल्या युध्दामुळे जगात अशांतता वाढू लागली आहे. एकुणच जगातील अशांतता कमी व्हावी आणि कोरोना महामारी निघून जावी तसेच संपूर्ण जग संकटमुक्त व्हावे, यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्या वाढदिनी महाशिवपंचायतन महायज्ञ केला आहे.

Mahayagya satara
शिवेंद्रसिंहराजे म्हणतात, उदयनराजेंना माझं बोलणं झोंबलं....

साताऱ्यातील गांधी मैदानावर हा यज्ञ संपन्न झाला असून यावेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले हे पत्नी वेदांतिकाराजेंसह सहभागी झाले होते. कोरोनाच्या संकटामुळे सर्वजण आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे वाढदिनी राजकिय आणि सांस्कृतिक कार्यक्रम टाळत शिवेंद्रसिंहराजेंनी वाढदिवस साध्या पध्दतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून वाचणाऱ्या पैशातून ग्रामीण भागात व सातारा शहरात विकास कामे करता येतील, असे त्यांनी सांगितले आहे. गात चाललेल्या अशांततेबद्दल तसेच कोरोना महामारी निघुन जावी जग संकटमुक्त व्हावे, यासाठी हा महायज्ञ करण्यात येत असल्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com