ज्यांना शिव्या देता, त्यांच्याशीच बँकेवर घेण्यासाठी चर्चेला जाता....

सातारा जिल्हा बँकेत योगदान दिलंय त्यांनीच या बँकेवर काम करावे. केवळ पाटीवर नाव लावण्यासाठी बँकेच्या संचालक पदावर येऊ नये, असा टोलाही त्यांनी लगावला.
ज्यांना शिव्या देता, त्यांच्याशीच बँकेवर घेण्यासाठी चर्चेला जाता....
Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosalefacebook

सातारा : सभापती रामराजेंना आमनेसामने या, असे म्हणणारे त्यांच्याशीच जिल्हा बँकेच्या निवडणूकीविषयी चर्चा करायला जातात. आपण कुठल्या घराण्यातील, आपण छत्रपतींच्या घराण्यातील. आपण त्यांना शिव्या देतो आणि त्यांच्याशी चर्चा करायला कशाला जाता, असा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना जिल्हा बँकेवर घेण्यावरून विचारलेल्या प्रश्नावर लगावला. सातारा जिल्हा बँकेत योगदान दिलंय त्यांनीच या बँकेवर काम करावे. केवळ पाटीवर नाव लावण्यासाठी बँकेच्या संचालक पदावर येऊ नये, असा सल्लाही त्यांनी दिला.

जिल्हा बँकेच्या निवडणूकीबाबत आज बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिलखुलासपणे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी उदयनराजेंना जिल्हा बँकेवर घेण्याबाबतचा निर्णय तुमच्यावर ढकलला आहे, याविषयी विचारले असता शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, यासंदर्भात माझ्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. तसेच उदयनराजेंकडूनही मला तशी विचारणा झालेली नाही. जिल्हा बँक पक्षविरहित राहावी, यासाठी आमचा प्रयत्न आहे.

Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
शिवेंद्रसिंहराजे आणि शशिकांत शिंदे यांच्या वादात रामराजेंची मध्यस्थी...

गेल्या पाच वर्षांच्या काळात बँकेची तिप्पट प्रगती झालेली आहे. आम्ही जरी सगळे संचालक विविध पक्षात असलो तरी आमच्यात समन्वय असून आम्ही बँकेच्या प्रगतीसाठी झटत आहोत. मात्र, काहीजण केवळ नावामागे जिल्हा बँक संचालक अशी पाटी लावण्यासाठी बँकेचे संचालक होण्याची इच्छा व्यक्त करतात. मुळात जिल्हा बँकेत येऊन बँकेसाठी योगदान देणाऱ्यांनी संचालक म्हणून यावे, असा टोला त्यांनी लगावला. मुळात सभापती रामराजेंना आमनेसामने या, असे म्हणणारे त्यांच्याशी जिल्हा बँकेच्या निवडणुकीविषयी चर्चा करायला जातात.

Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
ज्या विश्रामगृहात वाद झाला.. तेथेच रामराजे आणि उदयनराजे भेटले...

आपण कुठल्या घराण्यातील आहोत, आपण छत्रपतींच्या घराण्यातील. आपण त्यांना शिव्या देतो आणि त्यांच्याशी चर्चा करायला जातो. आता माझे हे म्हणणे ऐकल्यावर तर ते चर्चेला येऊच शकणार नाहीत, असा टोला त्यांनी उदयनराजेंचा नामोल्लेख टाळून लगावला. उदयनराजेंकडून चर्चेसाठी विचारणा झाल्यास तुम्ही काय भूमिका घेणार यावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, मी निर्णय घेणारा कोण. सर्व काही विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर ठरवतात. त्यांनीच निर्णय घ्यावा, असे सांगून शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंच्या निर्णयाचा चेंडू पुन्हा रामराजेंच्या कोर्टात ढकलला.

Related Stories

No stories found.