आमदार शिंदेंचे आव्हान शिवेंद्रसिंहराजेंनी स्वीकारले; म्हणाले, माझा हिसका सोसणार नाही....

शशिकांत शिंदे Shashikant shinde यांनी माझ्या पराभवाला शिवेंद्रसिंहराजे shivendraraje Bhosale जबाबदार असल्याचा आरोप केला. त्याला शिवेंद्रसिंहराजे यांनी जोरदार प्रतिउत्तर देत शिंदे यांच्यावर टीका केली.
आमदार शिंदेंचे आव्हान शिवेंद्रसिंहराजेंनी स्वीकारले; म्हणाले, माझा हिसका सोसणार नाही....
Shivendraraje Bhosale, Shashikant Shindesarkarnama

कुडाळ : हिशोब चुकते करण्याची भाषा शशिकांत शिंदे यांनी करू नये. मी तुमचे आव्हान स्वीकारले आहे. यापुढे दोन हात करण्याची तयारी ठेवा. तुमच्या पराभवाचे खापर माझ्यावर फोडू नका. मुंबईच्या गुंडगिरीला सातारी हिसका सोसणार नाही. यापुढे तुमची दहशत, गुंडगिरी जावळी तालुका चालू देणार नाही. तुमच्या पराभवाला तुमचा जावळीतील अनावश्यक हस्तक्षेपच जबाबदार आहे, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.

सोनगाव (ता. जावळी) येथे जिल्हा बॅंकेचे नवनिर्वाचित संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या सत्कार सोहळ्यात शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. सातारा येथे आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्या पराभवाला शिवेंद्रसिंहराजे भोसले जबाबदार असल्याचा आरोप केला. त्याला शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जोरदार प्रतिउत्तर देत शशिकांत शिंदे यांच्यावर टीका केली. श्री. भोसले म्हणाले, ‘‘शशिकांत शिंदे केवळ बगलबछ्यांच्या आणि त्यांच्या गुंडगिरीच्या दहशतीच्या राजकारणामुळे या निवडणुकीत पराभूत झाले. रांजणे यांच्या विजयामुळे जावळीत नवी सुरुवात झाली आहे. यापुढे मी जावळी तालुक्यातील सर्व निवडणुका कोणतीही राजकीय तडजोड न करता मोठ्या ताकदीने त्यांच्याविरोधात लढणार आहे. रांजणे यांचा विजय हा जावळीतील मतदारांनी ठरवून केलेला विजय आहे.’’

Shivendraraje Bhosale, Shashikant Shinde
या तीन चुकांमुळे शशीकांत शिंदेंचा झाला पराभव....

पक्षवाढीसाठी पक्षाच्या चौकटीत राहून काम केले म्हणता आणि दुसरीकडे पक्षातच गटबाजी करून पाडपाडीचे धंदे करता. राजेशाही थाटाचा आमच्यावर आरोप केला गेला. मात्र, प्रत्यक्षात शिंदेसाहेब राजेशाही थाट तर तुमचा मोठा आहे. आम्ही सर्वसामान्य आहोत आणि तुम्हीच स्वतः राजेशाही थाटात राजकारण करत आहात. तुमच्या राजेशाहीचा अतिरेक झाला. यामुळेच तुम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले. स्वतःच्या अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडायचे, असले धंदे आता बंद करा. वस्तुस्थिती स्वीकारा, असेही ते म्हणाले.

Shivendraraje Bhosale, Shashikant Shinde
माझ्या पराभवासाठी शिवेंद्रसिंहराजे जबाबदार ; हे त्यांचेच षडयंत्र आहे : शशिकांत शिंदे

जावळी तालुक्यात आता आरपारची लढाई सुरू झाली आहे. त्यामुळे या लढाईत काहीही झाले तरी आता तडजोड करणार नाही. दोन हात करण्याची तयारीही ठेवली आहे. गुंडगिरी दाखवण्याचा प्रयत्न केला तर सातारी हिसकाही तुम्हाला सहन करावा लागेल, असा इशाराही शिवेंद्रसिंहराजे यांनी शशिकांत शिंदे यांना दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.