पाच वर्षांत कामे केली असती तर, दुचाकीवर फिरावे लागले नसते...

शिवेंद्रसिंहराजे म्‍हणाले, ''सध्या सगळी नौटंकी सुरु आहे. हातातील संधी निघून गेल्‍याचे त्‍यांच्‍या लक्षात आले असून, आगामी काळात सातारची जनताच त्‍यांच्‍या नौटंकीवर पडदा टाकणार आहे.
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosaledesign@apglobale.com

सातारा : सातारा शहरात विविध कामांच्‍या प्रारंभाची पोस्‍टरबाजी सुरु आहे. पोस्‍टरबाजीचा खर्च पालिकेतू्न केला असेल तर त्‍या खर्चातून एखादे छोटेमोठे विकासकाम पूर्ण झाले असते. कोणतरी दुचाकीवरुन फिरल्‍याचेही माझ्‍या वाचनात आले. पाच वर्षे पालिकेची सत्ता तुमच्‍या ताब्‍यात आहे. या पाच वर्षांत सातारकरांची कामे केली असती तर दुचाकीवर फिरायची वेळ आली नसती, अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजेंचा नामोल्लेख टाळून केली.

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सुरूची या निवासस्थानी आज पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी पालिका आणि जिल्हा बँकेच्या निवडणूकीवरून उदयनराजेंवर निशाणा साधला. शिवेंद्रसिंहराजे म्‍हणाले, ''सध्या सगळी नौटंकी सुरु आहे. हातातील संधी निघून गेल्‍याचे त्‍यांच्‍या लक्षात आले असून, आगामी काळात सातारची जनताच त्‍यांच्‍या नौटंकीवर पडदा टाकणार आहे. पाच वर्षे सत्ता असतानाही त्‍यांना साताऱ्याच्‍या विकास करता आलेला नसून त्‍यांनी कामांच्‍या माध्‍यमातून सातारकरांची स्‍वप्‍नपुर्ती करणे आवश्‍‍यक होते.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
रामराजेंच्या भेटीवर उदयनराजे म्हणाले, माझा कोणीही.....

पालिकेला भ्रष्‍टाचाराचा अड्डा बनवत सत्ताधाऱ्यांनी अंधाधुंद कारभार केला आहे. याविरोधात आमचे नगरसेवक आवाज उठवत असले तरी बहुमताच्‍या जोरावर तो आवाज दाबण्‍यात आला. कोविडच्‍या नावाखाली सर्वसाधारण सभा न घेता भ्रष्‍टाचार दडपण्‍याचा प्रयत्‍न सत्ताधारी करत आहेत.'' सत्ताधाऱ्यांनी राबविलेल्‍या प्रत्‍येक उपक्रमात भ्रष्‍टाचार असून, निवडणूकाच्‍या तोंडावर कामे न करता बिले काढण्‍याची त्‍यांची तयारी सुरु असल्‍याचा आरोपही त्‍यांनी या वेळी केला. आमचे नगरसेवक कमी असूनही त्‍यांनी सातारकरांच्‍या विकासाला चालना देणारे उपक्रम राबविण्‍यावर भर दिला आहे.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजे समर्थक आमने-सामने; विकास कामांवरून श्रेयवाद रंगला....

''काम झाले तर माझ्‍यामुळे आणि नाही झाले तर, ते दुसऱ्यामुळे हा सत्ताधारी आघाडीच्‍या नेत्‍यांचा पायंडा आहे. दुसऱ्याच्‍या कामांचे श्रेय लाटणाऱ्या सत्ताधारी आघाडीच्‍या नेत्‍यांना सातारकरांशी काहीही देणेघेणे नसल्‍याचे दिसून येत आहे. आपण कोणते प्रकल्‍प राबवतो, त्‍याचा सातारकरांना काय फायदा होतोय, याचे भान देखील त्‍यांना नाही.'' ग्रेड सेपरेटरचा सातारकरांना किती फायदा झाला, त्‍याचा वापर किती जण करतात, हे तपासणे गरजेचे आहे. त्‍या ग्रेड सेपरेटरच्‍या फलकावरील संकल्‍पक म्‍हणून एक नाव होते. ग्रेड सेपरेटरचा वापर दिवसेंदिवस कमी होत असून, आगामी काळात त्‍याला प्रेक्षणीय स्‍थळाचा दर्जा द्यावा लागेल. त्‍यामुळे का होईना, बाहेरचे पर्यटक येतील व त्‍याचा वापर करतील, अशी कोपरखळीही त्‍यांनी उदयनराजे यांना मारली.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
सिडको, एमएसआरडीसीकडून भू्स्खलनग्रस्तांना घरे बांधुन मिळणार : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

नगराध्‍यक्षांचे ग्रहमान चांगले

पालिका आणि नगराध्‍यक्षांच्‍या कारभाराबाबत विचारले असता, शिवेंद्रसिंहराजे, या थेट नगराध्‍यक्षांचे ग्रहमान चांगले दिसते. त्‍यांची पत्रिका चांगली दिसते. कितीही आरोप झाले तरी त्‍या कार्यरत आहेत. यापूर्वीही एक लोकनियुक्‍त थेट महिला नगराध्‍यक्षा होत्‍या. त्‍यांना तर रजेवर जावे लागले होते. तशी वेळ या नगराध्‍यक्षांवर आली नाही, असे वक्‍तव्‍य त्‍यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com