खरंच उदयनराजेंमुळे शिवेंद्रराजेंचे मंत्रिपद हुकले?

जेव्हा उदयनराजे Udayanraje Bhosale स्वतःच सांगतात खरी गोष्ट...
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosalesarkarnama

सातारा : छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्यातली राजकीय लढाई महाराष्ट्राला नवीन नाही. त्यामुळे उदयनराजे यांनी विनंती केल्यामुळे शिवेंद्रराजे यांचे मंत्रीपद हुकले, अशा चर्चांना मागील काही दिवसांपासून उधाण आले होते.

2019 मध्ये भाजप भाजपमध्ये गेलेले दोन्ही राजे हे साताऱ्यांमधून लढले. मात्र, विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रराजे यांना यश मिळालं तर लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर या दोघांमध्येही कायमच शाब्दिक युद्ध बघायला मिळालं.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Satara: पालिकेची निवडणूक आल्यानेच उदयनराजेंची दिल्लीत नौटंकी.. शिवेंद्रसिंहराजे

अगदी दोन दिवसांपूर्वी शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. त्यामध्ये छत्रपती शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्याआधीच उदयनराजेंनी देवेंद्र फडणवीस यांना भेटून शिवेंद्रराजेंचा पत्ता कट केला, अशी चर्चा व्हायला सुरुवात झाली आणि त्यावर आज पुण्यामध्ये उदयनराजेंनी स्पष्टीकरण सुद्धा दिले. ते नेमकं काय म्हणाले....

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Satara : उदयनराजे फडणवीसांना भेटताच... शिवेंद्रसिंहराजेंचा पत्ता कट झाल्याची चर्चा...

उदयनराजे म्हणाले, ''मला समजत नाही, तुम्ही मला एवढ्या वर्षांपासून ओळखता. माझ्या पोटात एक आणि ओठात एक नसतं. जे असतं ते बेधडक असतं, कोणीपण असुदेत. माझ्या बुध्दीला पटतं आणि जे लोकांच्या हिताचे असते ते मी बोलत असतो. मी परिणामांना घाबरत नाही. ''

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Eknath Shinde : जेसीबीने पुष्पवृष्टी करत एकनाथ शिंदेंचे सातारा जिल्ह्यात स्वागत...

''माझी संकोचित बुध्दी नाही, कधी राहणारही नाही. माझी व्यापक बुद्धी आहे. व्यापक बुद्धी असल्यानेच आपण प्रगतीच्या मार्गाने जात असतो. जे संकोचित आहेत, त्यांना वाटते माझ्यामुळेच माझ्यामुळेच...मला काय दुसरे काम नाही काय, कमाल आहे. माझा संबंध काय येतो,'' असे उदयनराजेंनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com