सोनईतील गडाखांच्या विरोधकांनी बांधले शिवबंध : नेवाश्यात शिवसेनेची वाढली ताकद

सोनई हे माजी खासदार यशवंतराव गडाख ( Yashwantrao Gadakh ) व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) यांचे गाव.
Shankarrao Gadakh
Shankarrao GadakhSarkarnama

सोनई (जि. अहमदनगर) - सोनई हे माजी खासदार यशवंतराव गडाख व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) यांचे गाव. या गावात गडाखांना प्रकाश शेटे मित्रमंडळाचा विरोध होता. मात्र आज प्रकाश शेट व त्यांच्या समर्थकांनी शंकरराव गडाख यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेचे शिवबंध बांधून घेतले. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपूर्वी नेवासे तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे. ( Shivbandh built by the opponents of Gadakh in Sonai )

सोनई येथील धडाडीचे युवक कार्यकर्ते प्रकाश पोपटराव शेटे यांनी मित्र मंडळासह आज सायंकाळी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत हातात शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. परिसरातून या प्रवेशाचे स्वागत होत आहे.

Shankarrao Gadakh
यशवंतराव गडाखांनी संकटाला कसे नमवले.... शंकरराव गडाख यांनी सांगितला अनुभव

भारतीय जनता पक्षातील माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होवून यापुर्वी घोडेगाव, देवगाव, कुकाणे, खरवंडी, नेवासे येथील अनेक युवकांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. मंत्री गडाखांनी संपुर्ण तालुक्यात सुरू केलेल्या विकास कामांवर प्रभावित होवून अलीकडच्या तीन महिन्यांत पाचशेहून अधिक विविध संस्थेचे, पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व तरुण मंडळातील सदस्यांनी शिवबंधन बांधून 'जय महाराष्ट्र' केला आहे.

Shankarrao Gadakh
शंकरराव गडाख म्हणाले, पारनेरकरांनी मंत्री पदाची संधी हुकवली...

सोनई येथे आज सायंकाळी प्रकाश शेटे, अनिल शेटे, संतोष तेलोरे, सूरज शेटे, अक्षय शेटे, अशोक आगळे, विवेक आगळे, मधुकर येळवंडे यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. मंत्री गडाख यांनी सर्वांना शिवबंधन बांधून सत्कार केला. यावेळी बेल्हेकरवाडीचे माजी सरपंच भरत बेल्हेकर, मुस्लिम युवा मंडळाचे मार्गदर्शक जमशेद सय्यद उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in