
Shivajirao Kardile News : अहमदनगरचे भाजप नेते आणि राज्याचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले (Shivajirao kardile) यांनी स्वपक्षाच्याच असणाऱ्या म्हणजेच भाजपचे दिवंगत खासदार दिलीप गांधी यांचा मुलगा सुवेंद्र गांधी यांना फोनवरून धमकावल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमुळे सोशल मिडीयावर कर्डिले यांच्या गुंडगिरीची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. कर्डिले यांनी सुवेंद्र गांधी यांना वकील अभिषेक भगत यांच्या संदर्भात धमकी दिली आहे.
वाचा,
ये सुवेंद्र गांधी त्या भगताच्या किड्याला घेऊन आला तर नीट करुन पाठवीन बेट्या. त्या भगताच्या किड्याला लय पाठीशी घातल तर नीट करुन पाठवीन असं कार्डिले म्हणत आहेत. यावर सुवेंद्र गांधी म्हणतात की, अहो साहेब माझा काही संबंध नाही. त्यावर कार्डिल पुन्हा म्हणतात, आमच्या गावात बोटं घालायचा धंदा बंद करा. मी नीट करुन काढीन. राजकारण गेलं उडत, मला त्याचं काय घेणदेणं नाय, तो आमच्या विरोधात तो कुत्रा तिकडं तनपुरे कडं**** त्याला तुम्ही इकडं घेऊन येता. त्याचं हातपाय तोडणार आहे आम्ही या चार-पाच दिवसात, पण तुम्ही जर त्यात भाग घेतला तर तुमची पण करु आम्ही. आम्हाला काय फरक पडत नाय एखादा गुन्हा दाखल झाला तर. तुझा मैतर असेल तर घरात ठेव, पण परत जर त्याला इथ कोणत्या नेत्या, पुढाऱ्याकडं आणला तर त्याचं परिणाम भोगावे लागतील, एखादी केस होईल, गुन्हा होईल, आम्हाला काही फरक पडत नाही, अशा शब्दांत शिवाजीराव कर्डिले यांनी गांधी यांना खुली धमकी दिली आहे.
दरम्यान, यापुर्वीही कर्डिले यांच्यावर यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक हल्ल्याचा गुन्हा दाखल होता. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात घुसून तोडफोड करत आमदाराला पळवून नेल्याप्रकरणी कर्डिले आणि आमदार अरूण जगताप यांच्यासह ११९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाा होता. चार-पाच वर्षांपुर्वी शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी आमदार संग्राम जगताप यांना अधीक्षक कार्यालयात चौकशीसाठी बोलविले होते. यावेळी पण त्यावेळी कार्डिले यांच्यासह त्यांच्या कार्यकत्यांनी कार्यालयावर हल्ला करून तेथे तोडफोड करत जगताप यांना पळवून नेले होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.