कर्डिलेंची भविष्यवाणी : 3 जुलैपर्यंत फडणवीस मुख्यमंत्री होतील, नगर जिल्ह्याला तीन मंत्री

ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले ( Shivajirao Kardile ) यांनी राज्यातील राजकीय परिस्थिती पाहून भविष्य वर्तविले.
Shivaji Kardile News | Shivaji Kardile Latest News Updates
Shivaji Kardile News | Shivaji Kardile Latest News UpdatesSarkarnama

अहमदनगर - राज्यातील विधानपरिषदेची निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांचा विजय झाला. त्यामुळे अहमदनगरमध्ये आज भाजपतर्फे राम शिंदे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला. या प्रसंगी ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले ( Shivajirao Kardile ) यांनी राज्यातील राजकीय परिस्थिती पाहून भविष्य वर्तविले. त्यांनी वर्तविलेल्या भविष्यावर जिल्हाभर चर्चा होत आहे. Ahmednagar BJP News Update

या कार्यक्रमात जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकांच्या आगामी निवडणुकीवरही विचारमंथन झाले. या प्रसंगी ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राम शिंदे, मोनिका राजळे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, शिवाजीराव गोंदकर, अभय आगरकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, सोनाली नायकवाडी, सत्यजित कदम, जालिंदर वाकचौरे, दिलीप भालसिंग, सुवेंद्र गांधी, सचिन पोटरे, अश्विनी थोरात आदी उपस्थित होते.

Shivaji Kardile News | Shivaji Kardile Latest News Updates
कर्डिलेंचा तो ठराव आला राम शिंदेंच्या कामी : भाजप कार्यकर्त्यांत जल्लोष

शिवाजीराव कर्डिले म्हणाले, सत्ता असो अथवा नसो भाजप कार्यकर्ते नेतृत्त्वावर विश्वास ठेऊन काम करतात. राम शिंदे यांच्या रुपाने जिल्ह्याला विधानपरिषदेत संधी दिली, या बद्दल देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांचे आभार व्यक्त करतो. गरीब शेतकरी कुटुंबातील शिंदे हे मंत्री होतील पुढे विधानपरिषदेवरही जातील असे त्यांना स्वप्नातही वाटले नसेल. मात्र भाजपमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठी संधी दिली जाते, याचे हे उदाहरण आहे, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, राज्यात 2019मध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ओढून ताणून सरकार तयार केले. राज्यातील प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. आमदारांच्या बंडाच्या माध्यमातून जनतेच्या असंतोषाचा उद्रेक झाला आहे. त्यांच्याच मंत्र्यांना, आमदारांना सरकारमध्ये सन्मान नव्हता. महाविकास आघाडीचा सर्वात मोठा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला, असा आरोप त्यांनी केला.

Shivaji Kardile News | Shivaji Kardile Latest News Updates
तीन वर्षांनंतर राम शिंदे पुन्हा आमदार : कर्जत-जामखेडच्या भाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

एकनाथ शिंदे यांनी पाहिले की, राज्य सरकारमध्ये सन्मान मिळत नाही. त्यामुळे ते सन्मान मिळविण्यासाठी बाहेर पडले. 3 जुलैपर्यंत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील. मी काही हात पाहून भविष्य सांगत नाही. मी तोंड पाहून भविष्य सांगतो. राम शिंदे यांना फडणवीस विधानपरिषदेवर संधी देणारच होते म्हणून मी संधी साधून शिंदेंना विधानपरिषदेवर पाठविण्याचा ठराव मांडला होता. मला खात्री होती की राम शिंदे हे विधानपरिषदेवर आमदार होतील, असे गुपित त्यांनी सर्वांसमोर सांगतले. त्यामुळे आश्चर्य चकीत झालेले माजी आमदार चंद्रशेखर कदमांनी थेट कर्डिलेंच्या पाया पडले.

आता मी आणखी एक भविष्यवाणी करतो. यात राम शिंदे व राधाकृष्ण विखे पाटील मंत्री होतील. महिलांतून मोनिका राजळे मंत्री होतील. मात्र मला माजी ते माजीच ठेऊ नका. तसे केले तर तुम्हाला ठेवायचे की नाही याची शक्ती मी ठेऊन आहे. आमचे तुमच्यावर अतिक्रमण होणार नाही. आमदार बबनराव पाचपुते यांची तब्बेत चांगली नव्हती. ते आले तर त्यांच्याही मंत्रीपदाचा विचार करा, अशी कोपरखळीही कर्डिले यांनी मारली.

Shivaji Kardile News | Shivaji Kardile Latest News Updates
खासदार विखे म्हणाले, कर्डिले होणार आमदार...

शिंदे साहेब आता राज्यात फिरू नका. जिल्ह्यात फिरा. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकवा. मागील अडीच वर्षांत शेतकरी, मजूर, व्यापारी भरडून निघाला. रस्ते, पाणी, वीज यांची परिस्थिती चांगली नाही. महाविकास आघाडी आल्यावर त्यांनी भाजपची विकासकामे स्थागित करण्याचे काम केले. ते केवळ विकास कामांची नारळे फोडतात. मात्र ती कामे करत नाहीत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्यात मोठे काम झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना संपविण्याचे काम केले. आता राज्यात मिळणाऱ्या मंत्रीपदाचा फायदा जिल्ह्यातील भाजपला व्हावा, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com