शिवसेनेच्या सुनीता गडाख गर्जल्या : नेवाशात नारीशक्तीचा करिष्मा दाखवू

माजी मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) यांच्या पत्नी सुनीता गडाख यांनी नेवासे तालुक्यात शिवसेनेच्या नारीशक्तीचा करिष्मा दाखविण्याची तयारी सुरू केली आहे.
Sunita Gadakh
Sunita GadakhSarkarnama

सोनई ( जि. अहमदनगर ) - अहमदनगर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काल ( गुरूवारी ) आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीत नेवासे तालुक्यातील बहुतेक गटांत महिला आरक्षण पडले. त्यामुळे गडाख समर्थकांना हा मोठा धक्का समजला जात आहे, असे असले तरी माजी मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) यांच्या पत्नी सुनीता गडाख यांनी नेवासे तालुक्यात शिवसेनेच्या नारीशक्तीचा करिष्मा दाखविण्याची तयारी सुरू केली आहे. ( Shiv Sena's Sunita Gadakh roared: We will show the charisma of women power in Newasa )

जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीत नेवासे तालुक्यात आठ पैकी सात गटात महिलांचे आरक्षण निघाले तर पंचायत समितीच्या सोळा पैकी आठ गणात महिलांचे आरक्षण निघाले आहे. आरक्षण सोडतीने पुरुष पुढाऱ्यांना चांगलाच धक्का बसला असून माजी अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनील गडाख, पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार सह अनेकांना घरी बसण्याची वेळ आली आहे.

Sunita Gadakh
मराठा आरक्षणासाठी सुनीता गडाख यांचा राजीनामा 

या संदर्भात नेवासे पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता गडाख म्हणाल्या, जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीत नेवासे तालुक्यात महिलांना मिळालेल्या संधीचे नक्कीच सोने केले जाईल. माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी नेहमीच विविध संस्थेत नारीशक्तीला अग्रक्रम दिलेला असल्याने सर्व महिलांना 'हम भी कुछ कम नाही है' दाखवून देण्याची संधी मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Sunita Gadakh
गडाख, भांगरे, जगताप, शेलार, राऊत, परजणे, वाकचौरेंसह अनेक दिग्गजांना फटका

त्या पुढे म्हणाल्या की, नेवासे तालुक्यात माजी मंत्री गडाख यांनी पाच वर्षांपूर्वी क्रांतिकारी शेतकरी पक्षाची स्थापना केली. हा पक्ष नवखा असताना अनेक जेष्ठ कार्यकर्ते, विविध संस्थेचे पदाधिकारी व युवकांनी संघटनेला मजबुती दिली. 'क्रांतिकारी' ने पंचायत राज निवडणूक, नेवासे नगरपंचायत व विधानसभा निवडणुकीत यश मिळवून दाखविले होते. या पार्श्वभूमीवर आरक्षणाने अनेक पुरुष कार्यकर्त्यांचा हिरमोड झाल्याची सल मनात आहे असे सांगून सोडतीमधील आरक्षण स्वीकारून सर्व कार्यकर्ते महिलाराज यशस्वी करतील, असे त्यांनी सांगितले.

निवडणुकीत कितीही आरोप प्रत्यारोप झाले तरी संघटनेच्या माध्यमातून केलेले विकासकाम व महिला सक्षमीकरणाचे उपक्रम निश्चित उपयोगी पडतील असेही गडाख यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in