नगर जिल्ह्यात शिवसेनेचा सत्तेसाठी संघर्ष

अहमदनगर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसह नऊ नगरपालिकांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत.
Shivsena News, Ahmednagar news
Shivsena News, Ahmednagar newsSarkarnama

अहमदनगर - अहमदनगर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसह नऊ नगरपालिकांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यादृष्टीने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. शिवसेनेकडे खासदार सदाशिव लोखंडे, राज्यातील जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ), माजी आमदार विजय औटी ( Vijay Auti ) यांच्या सारखे दिग्गज नेते आहेत. या जोरावर शिवसेनेला जागा वाढतील असा विश्वास आहे. मात्र शिवसेना सत्तेचा जादूई आकडा गाठेल का हे लवकरच कळणार आहे. ( Shiv Sena's struggle for power in Nagar district )

राज्यात सध्या महाविकास आघाडीची सत्ता असून, शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना यामुळे उभारी मिळाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये घवघवीत यश मिळवून सत्तेच्या केंद्रस्थानी राहण्यासाठी आता गल्लीपासून ते मंत्रालयापर्यंतच्या सर्वच नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्ह्यात शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख असे दोन नेत्यांच्या दिमतीला शिवसैनेच्या कार्यकर्त्यांची फौज आहे. असे असले, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला सत्तेसाठी जास्त जागा मिळविण्याचे मोठे आव्हान आहे. (Ahmednagar news in Marathi)

Shivsena News, Ahmednagar news
असा झाला सदाशिव लोखंडेंचा चेंबूर ते शिर्डी राजकीय प्रवास

स्थानिक स्वराज्य संस्थेत गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आपले अस्तित्व टिकून आहे. जिल्ह्यातील काही गावातील ग्रामपंचायतीसह नगर पंचायत समितीवर शिवसेनेने आपला झेंडा फडकावलेला आहे. मंत्री गडाखांमुळे शिवसेनेचे ताकद वाढली. त्याचा फायदा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत होणार का? याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.

जिल्हा परिषदेत शिवसेनेचे सात सदस्‍य, तर जिल्ह्यातील चौदा पंचायत समितीत 19 सदस्‍य होते. त्या नेवासे पंचायत समितीमध्ये क्रांतीकारी पक्षाचे 12 व जिल्हा परिषदेचे सदस्य पाच आहेत. गडाख शिवसेनेत दाखल झाल्यामुळे नेवाशातील क्रांतीकारी पक्षाचे सर्वच पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेत दाखल झालेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेचे पंचायत समितीचे 30 व जिल्हा परिषदेचे 12 सदस्य असे बलाबल झाले होते. हे बलाबल आता आगामी निवडणुकीत वाढविण्यासाठी शिवसेनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

Shivsena News, Ahmednagar news
विजय औटी यांच्या राजकीय कारकिर्दीला लंकेंकडून कायमचा ब्रेक?

कर्जत, पारनेर व अकोले नगरपंचायतच्या निवडणुकीत शिवसेनेची ताकद वाढण्याऐवजी घटल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील पंचवार्षिकमध्ये कर्जतमध्ये शिवसेनेला खाते उघडता आले नव्हते. अकोले नगरपंचायतमध्ये एक, तर या वेळी दोन उमेदवार निवडून आलेले आहेत. पारनेर नगरपंचायतमध्ये मागील वेळेस 11 नगरसेवक निवडून आल्याने एक हाती सत्ता मिळवली होती.

Shivsena News, Ahmednagar news
सुजय विखेंचा जवळचा कार्यकर्ता शंकरराव गडाख, औटी यांनी फोडला...

पंचायत समिती निहाय बलाबल

अकोले - 4

संगमनेर - 2

पारनेर - 4

नगर - 7

कर्जत - 1

कोपरगाव - 1

जिल्हा परिषदेतील बलाबल

अकोले - 1

पारनेर - 2

नगर - 3

पाथर्डी - 1

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com