शिवसेनेच्या फक्त तोंडात बळ : विखेंची टीका

आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी शिवसेनेवर टीकेची तोफ डागली.
शिवसेनेच्या फक्त तोंडात बळ : विखेंची टीका
Radhakrishna Vikhe PatilParesh Kapse

अहमदनगर - भाजपच्या एका आंदोलना निमित्त भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील आज शिर्डीत होते. या वेळी त्यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी शिवसेनेवर टीकेची तोफ डागली. ( Shiv Sena's strength only in its mouth: Vikhen's criticism )

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना देशद्रोहाचे कलम लावायचे आणि तिकडे औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहणाऱ्यांच्या बाबतीत फक्त गाडण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेच्या फक्त तोंडात बळ आहे. ते कृती करू शकत नसल्याचा टोला आमदार विखे पाटील यांनी लगावला.

Radhakrishna Vikhe Patil
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, तात्कालिक बदलांमध्ये जिल्हा बँक पुढेही शेतकऱ्यांचीच रहावी

ते पुढे म्हणाले की, एका बाजूला हिंदुत्वाची नौटकी करायची आणि दुसरीकडे हिंदुत्व गुंडाळून ठेवायचे असे चित्र शिवसेनेचे पाहायला मिळत आहे. सत्तेत असतांनाही जे संभाजीनगरच नाव बदलू शकले नाहीत. एक प्रकारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेलाच त्यांनी हरताळ फासला असल्याची टीका त्यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारने सगळे नियम धाब्यावर बसविले आहेत. शिवसेना व राज्य सरकारच्या विरोधात जो बोलेल तो देशद्रोही व ओवेसींसारख्या लोकांनी त्यांचे गोडवे गायले तर तो सरकारचा तारणहार असल्याचे यातून स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Radhakrishna Vikhe Patil
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, महाराष्ट्रात कायद्याचे राज्य शिल्लक राहिलेले नाही...

मुळातच शिवसेना गोंधळलेल्या स्थितीत आहे. त्यांना त्यांचे हिंदुत्व समजेनासे झाले आहे, धर्म निरपेक्षता काय हेही त्यांना माहिती नाही. प्रत्येकवेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा घेतला जाणारा आधार आता फार काळ चालणार नाही, राज्यातील जनतेला कृती हवी आहे, ज्या तत्वासाठी शिवसेना सत्तेवर आली त्या मूळ हिंदुत्वालाच त्यांनी गुंडाळून ठेवले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.