Shivsena : शिंदेंच्या नेतृत्वखालील शिवसेनाच थोरली... शंभूराज देसाई

मंत्रीमंडळाचा Council of Ministers छोटा विस्तार Small expansion झाला आहे. लवकरच आणखी विस्तार Expansion होईल त्यामध्ये सर्व घटकांना सामावून घेण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री CM, उपमुख्यमंत्री DyCm करतील.
Shambhuraj Desai, eknath Shinde
Shambhuraj Desai, eknath Shindesarkarnama

सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना थोरली आहे. कारण आमच्याकडे ५५ पैकी ४० आमदार व १८ पैकी १२ खासदार आहेत. त्यामुळे आमचीच शिवसेना थोरली असून दसरा मेळाव्याबाबत मुख्यमंत्री शिंदे निर्णय घेतील, अशी माहिती राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिली.

मंत्री देसाई यांनी आज गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासकिय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या महाबळेश्वर येथील एका हॉटेलमधील मुक्कामाविषयी शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मोहितेंच्या मुख्यमंत्र्यांवरील टीकेविषयी विचारले असता मंत्री देसाई म्हणाले, कोण मोहिते, आमचा शिवसेनेचा जिल्हा प्रमुख तिथे बसलेत. मुळात आमची शिवसेना थोरली आहे.

Shambhuraj Desai, eknath Shinde
Maharashtra Politics Live : शंभूराज देसाई यांची मोठी घोषणा

कारण ५५ पैकी ४० आमदार व १८ पैकी १२ खासदार आमचे असल्याने आमचीच शिवसेना थोरली आहे, असे दसरा मेळाव्याबाबत मुख्यमंत्री शिंदे निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. आता आमचा मंत्रीमंडळाचा छोटा विस्तार झाला आहे. लवकरच आणखी विस्तार होईल त्यामध्ये सर्व घटकांना सामावून घेण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करतील.

Shambhuraj Desai, eknath Shinde
सातारचा पालकमंत्री कोण : शिवेंद्रसिंहराजे की शंभूराज देसाई

ते म्हणाले, कोरोनानंतर प्रथमच यावर्षी गणेशोत्सव उत्साहात साजरा होणार आहे. विविध गणेश मंडळांना एक खिडकी योजनेतून विविध परवानगी दिल्या आहेत. गणेशोत्सवासाठी पोलिस यंत्रणा, जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहेत. गणेशोत्सवात वाद्ये वाजवताना आवाजाच्या मर्यादेत राहून वाद्ये वाजवावीत. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात यावर्षी गणेशोत्सव धुमधडाक्यातक साजरा होईल. मुंबईत दहिहंडी उत्सव ज्याप्रमाणे साजरा झाला तसाच गणेशोत्सव साजरा होईल.

Shambhuraj Desai, eknath Shinde
शंभुराज देसाईंचा सातारा जिल्ह्याचा मास्टर प्लॅन ठरला...

कास पठारावरील बांधकामांविषयी मंत्री देसाई म्हणाले, यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करणार आहे. मी जिल्ह्यातील मंत्री म्हणून त्यांनी हा मला विषय सांगितला नाही. कदाचित ते हायकामांडशी बोलत असतील. त्यामुळे मला या प्रकरणाची पूर्ण माहिती नाही. पण, येथे कायद्याचे उल्लंघन होत असेल ते खपवून घेतले जाणार नाही.

Shambhuraj Desai, eknath Shinde
शिवसेनेतील सर्वात आधी कोण फुटलं? : शहाजी पाटील अन् शंभूराजे देसाई

मी कधीही कासला जात नाही, त्यामुळे तेथील माहिती मला नाही. पण प्रशासनाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी यांनी पहाणी केली असून त्यांचा अहवाल ते देतील, तो पाहून आम्ही काय ती कारवाई करू. राज्य उत्पादन शुल्क विभागात मनुष्यबळ कमी असल्याने त्यांच्या कारवाई कमी दिसतात. जिल्ह्यात या विभागात केवळ ४३ कर्मचारी असून एकुण 789 दुकाने आहेत. त्यामुळे लवकरच उत्पादन शुल्क विभागात कर्मचारी भरती होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com