नीलेश लंके प्रतिष्ठानला जमीन देण्याला शिवसेना नगरसेवकांचा विरोध : आज पारनेर बंद

पारनेर नगरपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे.
Parner
ParnerSarkarnama

अहमदनगर - पारनेर नगरपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. पारनेर नगरपंचायतने हॉस्पिटल उभारणीसाठी शहरातील गट नंबर 96 मधील 6 हेक्टर 29 आर इतकी जमीन नीलेश लंके प्रतिष्ठानला देण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा ठराव विशेष सभेत मांडला होता. या ठरावाला विरोध करत शिवसेना नगरसेवकांनी सभात्याग केला होता. या वादामुळे आज पारनेर शहरातील सर्व कारभार ठप्प आहेत. Parner News Update

या ठरावाला विरोध करत शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. मुख्याधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांना चार नगरसेवकांनी निवेदन दिले होते. शिवसेना विरोधानंतर जागा देण्याचा निर्णय होत असल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला.

Parner
2024मध्ये सुजय विखे विरुद्ध नीलेश लंके अशी लढत होणार का?

निवेदनात यांनी म्हटले आहे, की कोण्या एका प्रतिष्ठानने मौजे पारनेर येथील गट नंबर 96 मधील 6 हेक्टर 29 आर जागेची वैयक्तिक हॉस्पिटल उभारणीसाठी मागणी केली आहे. ही जागा सरकारी आहे. प्रतिष्ठानला देण्यास शिवसेना नगरसेवकांची तीव्र हरकत आहे. सदर जागेचा उपयोग गावातील अनेक ठिकाणी शासकीय कार्यालय आजमितीस दुरावस्थेत आहेत. त्यासाठी होऊ शकतो.

Parner
विजय औटी यांच्या राजकीय कारकिर्दीला लंकेंकडून कायमचा ब्रेक?

वाढत्या लोकसंख्येमुळे भविष्यात गावातील जनतेसाठी व्यायाम, फिरण्यासाठी ट्रॅक, बगीचा या अनेक गोष्टी करण्याकरिता उपयोगात आणू शकते. गावाची वाढती लोकसंख्या पाहाता गावाला स्टेडियम, स्विमिंग पूल, ट्रॅक तसेच नगरपंचायत हद्दीमध्ये यासारख्या अनेक सुविधा असाव्या लागतात. त्यासाठी भविष्यात या जागेचा उपयोग होऊ शकतो. घरकुल, म्हाडा तसेच इतर शासकीय घरांचे प्रकल्प बसवण्याचे झाल्यास सध्यस्थितीत नगरपंचायतीकडे जागा उपलब्ध नाही. त्यासाठी या जागेचा उपयोग होऊ शकतो.

गावातील पाणीपुरवठा पाईपलाईन हंगा तलावातून येते, हे सर्वांना ज्ञात आहेत. त्यामुळे भविष्यात जलशुद्धीकरण प्रकल्प बसवण्यासाठीही या जागेचा उपयोग होऊ शकतो. अशी कारणे शिवसेनेच्या नगरसेवकांनी निवेदनमध्ये दिली होती. नीलेश लंके प्रतिष्ठान व शिवसेनेच्या वादामुळे आज पारनेर शहर बंद आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com