‘शिंदे-फडणवीसांचं सरकार म्हणजे काळू-बाळूचा तमाशा; शहाजी पाटील हे त्यातील सोंगाड्या’

शिवसेनेचे खासदार विनायक राऊतांची एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारवर टीका
Vinayak Raut
Vinayak RautSarkaranam

पंढरपूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं सरकार म्हणजे काळू-बाळूचा तमाशा आहे, तर आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Patil) हे त्या सरकारमधील सोंगाड्या आहेत, अशी बोचरी टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (vinayak Raut) यांनी केली. (Shiv Sena MP Vinayak Raut criticizes Eknath Shinde-Devendra Fadnavis government)

शिंदे गटाचे आमदार ‌शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला मतदार संघात आज (ता. २१ ऑगस्ट) शिवसेनेचा निर्धार मेळावा‌ झाला. त्या मेळाव्यात बोलताना खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळू बाळू तमाशाची, तर आमदार शहाजीबापू पाटील यांना तमाशातील सोंगाड्याची उपमा देत सरकारची खिल्ली उडवली. महाराष्ट्रात सध्या काळूबाळूचा तमाशा सुरू आहे. एक दाढीवाला आहे, एक बिनदाढीवाला. बिनदाढीवाल्याच्या मनात आलं की घेतला माईक. लगेच दाढीवाला पडला उताणा. राष्ट्रगीतासाठी कसं उभं राहावं, हे ज्यांना कळत नाही, असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळावा, हे आपलं दुर्दैवं आहे.

Vinayak Raut
‘दामाजी’ची सत्ता गमावलेले समाधान आवताडे खासगी साखर कारखाना सुरू करणार

शिवसेनेने बंडखोर आमदारांच्या मतदार संघात निर्धार मेळावे घेतले जात आहेत. या मेळाव्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत खासदार विनायक राऊत यांनी बंडखोर आमदारांवर चौफेर हल्ला‌ केला.

Vinayak Raut
शहाजी पाटलांसारखा माणूस फक्त विनोद करू शकतो : विनायक राऊत

राऊत म्हणाले की, शिंदे आणि फडणवीस सरकारने मागील सरकारने घेतलेले लोकहिताचे अनेक निर्णय रद्द केले आहेत. दुसरीकडे, हे सरकार काहीही निर्णय घेऊ लागले आहे. त्यामुळे राज्यात काळू-बाळूचा तमाशा सुरू असल्याचा भास होतो. आमदार शहाजी पाटील हा मिमिक्री करणारा माणूस आहे. ज्यांना तमाशा काढायचा आहे, त्यांनी खुशाल त्याला तमाशात सोंगाड्या म्हणून घेऊन जावे. ते चांगले काम करतील, असा मिश्किल टोलाही खासदार राऊत यांनी लगावला.

Vinayak Raut
'वर्षा बंगल्यावर शपथ घेणारे गुलाबराव पाटील दुसऱ्या दिवशीच गुवाहाटीला पळून गेले!'

सांगोला‌ तालुक्याला ही एक औदासा मिळाली आहे. ही औदासा घालण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे, असे आवाहनही खासदार राऊत यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in