कोल्हापुरातील अदानी-अंबानीपासून सावध राहा : मंडलिकांचा मुश्रीफ-पाटलांवर हल्लाबोल

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत राजकीय पादत्राणे बाहेर ठेवा म्हणून सांगणाऱ्यांनी हिंमत असेल तर मतदारांना टोकण देवू नका.
कोल्हापुरातील अदानी-अंबानीपासून सावध राहा : मंडलिकांचा मुश्रीफ-पाटलांवर हल्लाबोल

Hasan Mushrif-Sanjay Mandlik-Satej Patil

Sarkarnama

कोल्हापूर : राजकीय जोडे बाहेर ठेवून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक लढवणारे बाहेर येताना भाजपचे जोडे घालू नयेत म्हणजे झाले. जिल्ह्यातील वेगवेगळ्या निवडणुकांत, वेगवेगळ्या लोकांची साथ घ्यायची आणि सर्व संस्था आपल्या ताब्यात घ्यायच्या हीच भूमिका काही नेत्यांची आहे. या देशात अदानी-अंबानी राज्य करत आहेत असे म्हणतात. पण, कोल्हापूर जिल्ह्यातील अदानी आणि अंबानी आहेत, त्यांच्यापासून आपण सावध राहिले पाहिजे. अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी आज (ता. ३० डिसेंबर) ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांचे नाव न घेता केली. (Shiv Sena MP Sanjay Mandlik criticizes Hasan Mushrif, Satej Patil)

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (केडीसीसी) बॅंकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना प्रणित राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीच्या ठरावदार मतदारांचा मेळावा कळंबा येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते.

Hasan Mushrif-Sanjay Mandlik-Satej Patil

मोदींची पवारांना सत्ता स्थापनेची ऑफर आणि चंद्रकांत पाटील म्हणतात...

खासदार मंडलिक म्हणाले, जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत राजकीय पादत्राणे बाहेर ठेवा म्हणून सांगणाऱ्यांनी हिंमत असेल तर मतदारांना टोकण देवू नका, पाकिट देवू नका, सहलीवर घेवून जावू नक. मग जिल्हा बॅंकेत परिवर्तन निश्‍चितपणे झाल्याशिवाय राहणार नाही. जिल्हा बॅंकेच्या प्रक्रिया गटातील मतदारांना टोकण वाटप केले जात आहे. त्यांची शपथ घेतली जात आहे. जर तुमचा कारभार चांगला आहे, तर शपथा घ्यायला मतदाराना उचलून घेवून जावू नका. त्यांना पैशाचे आमिष दाखवू नका, असेही आव्हानही मंडलिक यांनी मुश्रीफ आणि पाटील यांना दिले.

Hasan Mushrif-Sanjay Mandlik-Satej Patil

चंद्रकांतदादांचा नवा बॉम्ब : सरकारमधून बाहेर पडून भाजपसोबत सत्तास्थापनेसाठी चढाओढ!

मुश्रीफ यांनी बॅंकेची निवडणूक बिनविरोध करायला सांगितले होते. यात दुमत नाही. पण, स्वाभिमान गहाण ठेवून सत्तारूढ पॅनेलमध्ये जाणे अशक्‍य होते, त्यामुळे आम्ही समविचारी आघाडी केली. आम्ही म्हणतोय तेच करा, हे चालणार नाही, असा टोलाही त्यांनी दोन्ही मंत्र्यांना लगावला.

Hasan Mushrif-Sanjay Mandlik-Satej Patil

ज्याच्यावर वार झालेत त्याने नावे सांगितली आहेत : उदय सामंतांचा राणेंना इशारा

यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार संपतराव पवार-पाटील, माजी आमदार चंद्रदिप नरके, सत्यजीत पाटील, सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, अजित नरके, एस.आर.पाटील, रवी मडके उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.