मातोश्रीवर सर्वांना सोबत घेऊन जाईन! राठोडांनंतर सुहास कांदेचीही तयारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंड करण्यात सुहास कांदे आघाडीवर होते.
Shiv Sena MLA Suhas Kande Latest Marathi News
Shiv Sena MLA Suhas Kande Latest Marathi NewsSarkarnama

शिर्डी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गेलेल्या 40 बंडखोर आमदारांच्या मनात अजूनही 'मातोश्री'बद्दल आपुलकी असल्याचे स्पष्ट झालं आहे. 'मातोश्री'तून बोलावणं आलं तर पुन्हा जाईन, असं वक्तव्य माजी मंत्री संजय राठोड यांनी मंगळवारी केलं होतं. त्यापाठोपाठ आमदार सुहास कांदेही 'मातोश्री'वर जायला तयार आहेत. त्यामुळे बंडखोर आमदारांच्या मनात नेमकं चाललंय काय, याबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. (Shiv Sena MLA Suhas Kande News)

हिंदुत्व व विकासकामांच्या मुद्यावर शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांनी बंड केलं आहे. जवळपास पंधरा दिवसांच्या राजकीय घडामोडींनंतर हे आमदार आता आपआपल्या मतदारसंघात परतले आहेत. सर्वच आमदारांचे त्यांच्या समर्थकांनी जल्लोषात स्वागतही केले. त्यानंतर आता हे आमदार माध्यमांशी बोलत आपल्या मनातील भावना व्यक्त करू लागले आहेत.

Shiv Sena MLA Suhas Kande Latest Marathi News
जितेंद्र नवलानीला शिंदे सरकारकडून क्लिन चिट; खंडणी प्रकरणाची चौकशी पोलिसांनी गुंडाळली

नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी बुधवारी शिर्डी येथे भेट दिली. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, आम्हाला आजही मातोश्रीवर बोलवावे असे वाटते. परंतु बोलावलं तर एकटा जाणार नाही, सर्वजण सोबत जाऊ.' कांदे यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, आम्ही गुवाहाटीत होतो त्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत, अशी प्रार्थना साईबाबांना केली होती. बाबांनी माझ्या झोळीत ती भेट टाकली आणि मला न्याय दिला त्यामुळे साईबाबांचे आभार मानण्यासाठी सपत्निक दर्शनासाठी आलोय, असं कांदे यांनी यावेळी सांगितलं.

Shiv Sena MLA Suhas Kande Latest Marathi News
भालके गटाला धक्का : १८ वर्षांनंतर विठ्ठल कारखान्यात सत्तांतर

राज्य शेतक-यांच्या आत्महत्या मुक्त व्हावे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातुन राज्याचा विकास व्हावा, अस‌ साकडं बाबांना घातल्याचेही कांदे म्हणाले. ज्यांच्यावर मी खुप प्रेम केले त्यांना मुख्यमंत्री पद मिळालंय, आता साईबाबा जी जबाबदारी देतील ती मी स्वीकारेल, असं सांगत कांदे यांनी मंत्रिपद मिळालं नाही तरी चालेल, असंही स्पष्ट केलं.

राऊतांना खोचक टोला

संजय राऊतांवर आमची खदखद नव्हती. विकासकामांसाठी आम्ही बाहेर पडलो. मात्र, संजय राऊत ज्या चाळीस मतांवर खासदार झाले, त्यांनाच ते रेडा, डुक्कर म्हणाले आहेत. ते मोठे आणि ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही छोटे कार्यकर्ते आहोत, असा टोला कांदे यांनी राऊतांना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com