आम्हाला कोणीही विचारत नाही : माझं सोडा; बबनदादांना तरी मंत्रिपद मिळायला हवे होते!

शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांची आपल्याच सरकारवर टीका
Shahaji Patil-babandada shinde
Shahaji Patil-babandada shindesarkarnama

पंढरपूर : ‘‘राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात माढा लोकसभा मतदारसंघातील एकाही आमदाराला संधी मिळालेली नाही. आम्हाला कोणालाही त्यांनी घेतलेले नाही. माझं सोडा शिवसेनेतून (shivsena) मी पहिल्यांदा निवडून आलो आहे. पण, माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे (baban shinde) यांच्यासाख्या ३०-३० वर्षे निवडून आलेल्यांनाही संधी मिळालेली नाही. आम्हाला वाटत नाही या सरकारमध्ये आम्हाला कोणी खाईल म्हणून...घर की कोंबडी दाल बराबर...अशी आमची अवस्था होऊन बसलेली आहे,’’ अशा शब्दांत शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. (Shiv Sena MLA from Sangola Shahaji Patil criticizes his own government)

पंढरपूर येथील एका खासगी हाॅस्पिटलच्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमात आमदार पाटील यांनी आपल्याच सरकारवरील नाराजी भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासमोर बोलून दाखवली. राज्यात काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यामुळे अनेक इच्छुकांची मंत्रीपदाची संधी हुकली आहे. शिवसेनेचे आमदार पाटील यांनीदेखील मंत्रीपद न मिळाल्याने उघडपणे आपल्या मनातील भावना बोलून दाखवली.

Shahaji Patil-babandada shinde
परबांच्या आदेशानंतर प्रा. सावंत शिवसेनेत पुन्हा सक्रीय : पक्ष सोपवणार मोठी जबाबदारी!

आमदार पाटील म्हणाले की, मी शिवसेनेच्या तिकिटावर सांगोल्यातून पहिल्यांदा निवडून आलो आहे, त्यामुळे कदाचित मला संधी मिळाली नसावी. मला अगोदरच सांगण्यात आलं होतं, गडबड करायची नाही, लांब बसायचे, त्यानुसार आम्ही आपलं लांब बसलो. पण, बबनदादा शिंदे यांच्यासाखे ३०-३० वर्षे निवडून आलेल्या आमदारांनाही संधी मिळालेली नाही. त्यामुळे आम्हाला वाटतं नाही की या सरकारमध्ये आमची कोणी दखल घेतील म्हणून...आमचा कोणी विचारही करायला तयार नाहीत. गप्प बसा...जावा गावाकडं, असं आम्हाला सांगितलं जातंय, असं सांगत आमदार पाटील यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली.

Shahaji Patil-babandada shinde
आमदार महेश लांडगेंचा डाव अमोल कोल्हेंनी त्यांच्यावरच उलटवला!

यापूर्वीही आमदार पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर ते चांगलेच अडचणीत आले होते. मध्यंतरी एका साखर कारखान्याच्या गाळप हंगामाच्या कार्यक्रमात साखर कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांना पैसे वाटप करुन निवडणूक जिंकली, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावेळी त्यांच्या या वक्तव्याविषयी सर्वच स्तरातून टीका झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा आमदार पाटील यांनी राज्य सरकारमध्ये आपणाला कोणी विचारत नाही, असे सांगत मनातील खदखद बाहेर काढली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com