तानाजी सावंत यांच्या वाहनाचा पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात

तानाजी सावंत हे शनिवारी रात्री भूम-परांड्याहून पुण्याच्या दिशेने निघाले होते.
तानाजी सावंत यांच्या वाहनाचा पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात
Shiv Sena MLA Tanaji SawantSarkarnama

पुणे : शिवसेनेचे (Shiv Sena) नेते तानाजी सावंत यांच्या वाहनाचा शनिवारी रात्री उशिरा पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात झाला. सुदैवाने या अपघातात सावंत यांच्यासह वाहनातील कुणालाही दुखापत झालेली नाही. त्यांच्या वाहनाचे किरकोळ नुकसान झाले. (Tanaji Sawant Vehicles Accident News)

तानाजी सावंत हे शनिवारी रात्री भूम-परांड्याहून पुण्याच्या दिशेने निघाले होते. त्यांचे वाहन पुणे-सोलापूर महामार्गावर वरवंडमध्ये आल्यानंतर अपघातग्रस्त झाले. यात सावंत यांच्यासह त्यांचे सहकारी बचावले असून वाहनाचे किरकोळ नुकसान झाले आहे.

Shiv Sena MLA Tanaji Sawant
केतकी चितळे प्रकरण आता राज्यपाल दरबारी; सीबीआयची एन्ट्री होणार?

सावंत हे दोन दिववस आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. उस्मानाबाद, भूम आणि परंडा येथील शिवसंपर्क अभियानाच्या बैठकीनंतर पुण्याला निघाले होते. दरम्यान, सावंत यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात उघडपणे भूमिका घेतली होती. तसेच ते शिवसेना सोडणार असल्याची चर्चाही होती.

Shiv Sena MLA Tanaji Sawant
चूक करणाऱ्याला निलंबित करा! अजितदादांनी मनिषा म्हैसकरांसह अधिकाऱ्यांना स्टेजवरच झापलं!

सावंत यांनी उस्मानाबाद येथे बोलताना याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. घरी बसेन पण दुसऱ्या पक्षात जाणार नाही, असं ते म्हणाले आहेत. शिवसेनेला दुय्यम वागणूक दिली जात असल्याची खदखद सावंत यांनी यापूर्वीही व्यक्त केली आहे. शनिवारीही त्यांनी याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in