Arjun Khotkar : गेले खोतकर कुणाकडे? शिंदे गट म्हणतोय, आम्हाला पाठिंबा अन् ते म्हणतात...

खोतकर यांनी सोमवारी सकाळी दिल्लीत शिंदे यांची भेट घेतली आहे.
CM Eknath Shinde News, Arjun Khotkar News, Uddhav Thackeray Latest News
CM Eknath Shinde News, Arjun Khotkar News, Uddhav Thackeray Latest NewsSarkarnama

मुंबई : शिवसेनेचे माजी मंत्री व उपनेते अर्जुन खोतकर यांनी सोमवारी नवी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे ते शिंदे गटात सामील झाल्याच्या चर्चेला उधाण आले. पण भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना आपण निर्णय बदललेला नाही, शिवसेनेतच (Shiv Sena) असल्याचे खोतकरांनी सांगितले. पण त्यानंतर काही वेळात शिंदे गटाकडून खोतकरांनी पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. त्यावरून आता खोतकर नेमके कुठे, यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. (Arjun Khotkar Latest News)

खोतकर हे दोन दिवसांपूर्वीच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या औरंगाबाद येथील शिवसंवाद यात्रेत सहभागी झाले होते. .यावेळी त्यांनी जोरदार भाषण करत आपण शिवसेनेतच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. पण सोमवारी त्यांनी थेट दिल्लीत शिंदे आणि फडणवीसांची भेट घेतली. त्यामुळे ते शिंदे गटात सामील झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

CM Eknath Shinde News, Arjun Khotkar News, Uddhav Thackeray Latest News
Shiv Sena : अर्जुन खोतकरांचाही ठाकरेंना चकवा; दिल्लीत शिंदे गटात झाले सामील?

काही वेळाने खोतकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपण शिवसेनेतच असल्याचे स्पष्ट केलं. ते म्हणाले, भेट झाली तर चर्चा होतेच. या भेटीचे वेगळे अर्थ काढू नये. मी अजून निर्णय बदलेला नाही. मी शिवसेनेतच आहे. भेट झाली याचा अर्थ पक्ष बदलला असा होत नाही. मी शिवसेनेतच आहे.

खोतकरांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर शिंदे गटाकडून प्रसिध्दी पत्रक काढत खोतकरांनी शिंदे यांना पाठइंबा दिल्याचे जाहीर केले. यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. खोतकर नेमके ठाकरे की शिंदे गटात यावरून तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. दरम्यान महाराष्ट्र सदनात अर्जून खोतकर यांनी शिंदे यांची भेट घेतल्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. ते शिंदे यांच्याशेजारी उभे आहेत. तर दुसऱ्या बाजूला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेही आहेत. तसेच शिवसेनेतील काही बंडखोर खासदार आणि माजी मंत्री सदाभाऊ खोतही या फोटोत दिसत आहेत.

CM Eknath Shinde News, Arjun Khotkar News, Uddhav Thackeray Latest News
Shiv sena : उद्धव ठाकरे सुरतला गेले असते तर ?

ईडीने खोतकर यांचा साखर कारखाना नुकताच जप्त केला आहे. त्यामुळे तेही शिंदे गटात जाऊ शकतात, अशी चर्चा होती. पण खोतकर यांनी ही चर्चा फेटाळून लावली होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की, दिल्लीत (Delhi) महाराष्ट्र सदनात माझी आणि शिंदे यांची समोरासमोर भेट झाल्याने आमच्या दोघांमध्ये नमस्कार सुद्धा झाला. नमस्कार करणं ही महाराष्ट्राची संस्कृती मग मी नमस्कार सुद्धा करायचा नाही का?, अशी प्रतिक्रिया खोतकर यांनी दिली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in