वरुण सरदेसाईंना वाघनखे भेट दिली आणि तानाजी सावंतांनी पंजा मारला...

शिवसैनिकांनी आपल्या तलवारी विरोधकांवर चालवाव्यात; आपल्याच सहकाऱ्यांच्या पायात पाय घालू नये : वरुण सरदेसाई
Varun Sardesai-Tanaji Swanat
Varun Sardesai-Tanaji SwanatSarkarnama

सोलापूर : युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई (Varun Sardesai) हे आज (ता. २८ मार्च) मेळाव्याच्या निमित्ताने सोलापुरात आले हेाते. या मेळाव्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून वरूण सरदेसाई यांचा चांदीची वाघनखे भेट देऊन सत्कार करण्यात आला. नेमके याच कार्यक्रमात संपर्कप्रमुख आणि माजी मंत्री तानाजी सावंत (Tanaji Swanat) यांनी दोन काँग्रेसवर पंजा मारत त्यांना नामोहरम करून सोडले. या दोन्ही प्रसंगाची आज सोलापुरात चर्चा रंगली होती. (Shiv Sainiks should wield their swords against opponents : Varun Sardesai)

सोलापुरात जिल्हाभरातील युवा सैनिक, युवतींची मेळाव्याला मोठी गर्दी झाली होती. अनेकदा विनंती करूनही सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाला होता. ढोल, ताशा, हालग्यांसह तुताऱ्यांनी हुतात्मा स्मृती मंदिर सभागृह दणाणून गेले होते.

Varun Sardesai-Tanaji Swanat
‘मला आता पुढच्या निवडणुकीत निवडून देऊ नका...’ : अजितदादा भरसभेत असे का म्हणाले?

या मेळाव्यात बोलताना वरुण सरदेसाई म्हणाले की, शिवसैनिक हा लढाऊ आहे. त्याच्या लढवय्या वृत्तीचा फायदा विरोधकांना नामोहरम करण्यासाठी व्हावा. मात्र, आपल्याच पक्षातील सहकाऱ्यांविरुद्ध कट करास्थाने करू नयेत. शिवसैनिकांनी आपल्या तलवारी विरोधकांवर चालवाव्यात. आपल्याच सहकाऱ्यांच्या पायात पाय घालू नये; अन्यथा ढालही आपलीच आणि तलवारही आपलीच, यामुळे दोन्ही शिवसेनेचे नुकसान होईल.

Varun Sardesai-Tanaji Swanat
नाराज नेते शिवसेनेला कुठे घेऊन जाणार...? जाधव, गीते, किर्तीकर आणि आता सावंत!

युवा सेनेची राज्यभर सदस्य नोंदणी सुरू असून राज्यात पंधरा लाख युवा सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातून 50 हजार सदस्यांची नोंदणी करावी, असा संकल्प युवा सेनेचे सचिव वरुण सरेदसाई यांनी कार्यकर्त्या संवाद मेळाव्यात केला. यावेळी त्यांनी दोन निर्धार करण्यात येणार असल्याचे सांगितले. विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवा सेनेला राज्यभर वर्चस्व मिळावे. मुंबई विद्यापीठासह राज्यातील सर्व विद्यापीठाच्या निवडणुका युवा सेनेने जिंकाव्यात, तसेच राज्यव्यापी युवा सदस्य नोंदणी मोहीम सुरू करावी. सोलापूर जिल्ह्यात किमान ५० हजार सदस्य नोंदणी करावी, असा निश्‍चय या मेळाव्यात करण्यात आला.

Varun Sardesai-Tanaji Swanat
राष्ट्रवादीचा ग्रामपंचायत सदस्यही कोटींची कामे आणून आमच्या छाताडावर नाचतो : सावंतांची खदखद!

आमदार तानाजी सांवत यांनी आपल्या भाषणात दोन्ही कॉंग्रेसवर जोरदार निशाना साधला. या वेळी व्यासपीठावर भाऊसाहेब आंधळकर, जिल्हाध्यक्ष गणेश वानकर, शहराध्यक्ष गुरुशांत धत्तुरगावकर, महिला आघाडीच्या सीमा पाटील, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश काळजे, प्रताप चव्हाण, अमेय घोले आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्‍वेता हुल्ले यांनी केले, तर विभागीय सचिव अक्षय ढोबळे यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com