शिरूरचे खासदार शोधूनही सापडत नाहीत : राऊतांची टीका

खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे ( Amol Kolhe ) यांच्यावर नाव न घेता टीका केली.
शिरूरचे खासदार शोधूनही सापडत नाहीत : राऊतांची टीका
Sanjay RautSarkarnama

मंचर ( जि. पुणे ) - लांडेवाडी (ता.आंबेगाव) येथे शिवसेना कार्यकर्त्यांच्या आज मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे ( Amol Kolhe ) यांच्यावर नाव न घेता टीका केली. ( Shirur MPs can't be found: Sanjay Raut's criticism without mentioning Amol Kolhe's name )

या मेळाव्याला माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन अहिर, जिल्हाप्रमुख माजी आमदार शरद सोनवणे, शिवसेनेचे नेते सुरेशराव भोर, राजू जवळेकर, उपजिल्हा प्रमुख सुनील बाणखेले, भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे, देविदास राजगुरू, सुरेश घुले, अशोक बाजारे, राम तोडकर, संतोष डोके, रवींद्र वळसे-पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Sanjay Raut
संजय राऊत म्हणाले, भोंगे आंदोलनाचा सर्वाधिक फटका हिंदूंनाच बसला...

खासदार संजय राऊत म्हणाले की, शिरूर लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे जनतेसाठी 24 तास उपलब्ध होते. आताच्या विद्यमान खासदारांना शोधावे लागते. शिरूरचे खासदार शोधूनही सापडत नाहीत. हे आता जनतेच्या ही लक्षात आले आहे. अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Sanjay Raut
बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी मी पदरचे पैसे खर्च केलेत : आढळराव पाटील

राऊत पुढे म्हणाले, “तुम्ही उमेद हरवुन बसला तर शत्रूला बरे वाटते. आज लोकसभा व विधानसभा आपल्याकडे नाही मात्र भविष्यात नसतील असे नाही. राजकारण खूप चंचल असते. मात्र मतदार हे त्याहून ही चंचल असतात. आढळराव पाटील यांच्या पराभवाबाबत लोक हळहळ व्यक्त करतात. कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम करावे.”

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.