शिर्डीत फूल विक्रेते चिडले : सुरक्षारक्षकांशी भिडले

शिर्डीत ( Shirdi ) साईबाबाच्या मंदिरात 10 महिन्यांपासून हार फुलांच्या विक्रीवर बंदी आहे.
shirdi
shirdi Sarkarnama

अहमदनगर - शिर्डीत ( Shirdi ) साईबाबाच्या मंदिरात 10 महिन्यांपासून हार फुलांच्या विक्रीवर बंदी आहे. त्यामुळे हार फुले विक्री करणाऱ्या लोकांना आर्थिक अडचणींना समोरे जावे लागत आहे. त्यामुळे साईबाबा मंदिर परिसरातील हार, फुले, प्रसाद विक्रेत्यांत संताप आहे. आज हा संताप व्यक्त झाला.

शिर्डीतील साईबाबा मंदिरात मागील 10 महिन्यांपासून हार, फुले विक्रीला बंदी आहे. त्यामुळे आमचे मोठे नुकसान होते असल्याचे हार-फुले विक्रेत्यांचे मत आहे. ही बंदी उठवावी यासाठी या विक्रेत्यांनी आज हार, फुले व प्रसाद घेऊन मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला साईबाबांचे दर्शन घेऊ द्या, असे विक्रेते म्हणत होते.

shirdi
साई भक्तांची ऑनलाईन फसवणूक : साई संस्थांकडून गुन्हा दाखल

अचानक मोठ्या संख्येत विक्रेते पाहून मंदिरातील सुरक्षारक्षकांनी त्यांना अडविले. त्यांच्या हातातील हार, फुले, प्रसाद काढून घेतला. कोरोना काळापासून ही बंदी आहे. या बंदीला जवळपास 10 महिने झाले आहेत. त्यामुळे ही बंदी उठवावी अशी मागणी होत होती. हुकुमशाही बंद करो कशा घोषणाही या विक्रेत्यांनी मंदिर परिसरात दिल्या.

shirdi
बंगल्यांचे वाटप : विखे-पाटलांना रॉयलस्टोन, राठोड मुख्यमंत्र्यांचे शेजारी, बहुचर्चित रामटेक केसरकरांच्या वाट्याला!

आज सुरक्षारक्षक व फूल विक्रेते यांच्यात झटापट झाली. विक्रेत्यांनी मंदिरातील बंदी उठवावी अशी मागणी केली. मंदिरात वाढीव दराने फुले व हारांची विक्री होते, असे मंदिर विश्वस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही बंदी विश्वस्तांनी घातली आहे. पोलिसांनी आंदोलन करत असलेले विक्रेते व संस्थान विश्वस्त यांच्यात मध्यस्ती करत प्रकरणावर पडदा पाडला. विक्रेत्यांना हार, फुले, प्रसादा विना मंदिरात प्रवेश देण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in