Rajesh Kshirsagar : शिंदे हे माझे राजकीय गुरू : त्यांच्या नेतृत्त्वाला जनतेने स्वीकारले

शिवसेनेने कोल्हापूरच्या रस्त्यांवर झोळी फिरवून राज्य सरकार विरोधात प्रतीकात्मक निषेध आंदोलन केले.
Eknath Shinde | Rajesh Kshirsagar
Eknath Shinde | Rajesh Kshirsagar Sarkarnama

Rajesh Kshirsagar : कोल्हापूर - राज्यात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर त्यांनी 1 एप्रिलपासूनचे निर्णय स्थगित केले आहेत. यात शाहू समाधी स्थळाच्या 10 कोटी रुपयांच्या कामाचा समावेश आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात राज्य सरकार विरोधात नाराजी आहे. शिवसेनेने कोल्हापूरच्या रस्त्यांवर झोळी फिरवून राज्य सरकार विरोधात प्रतीकात्मक निषेध आंदोलन केले. राज्य सरकारच्या निर्णया संदर्भात शिंदे गटातील आमदार तथा राज्य नियोजन मंडळाचे सदस्य राजेश क्षीरसागर ( Rajesh Kshirsagar ) यांनी राज्य सरकारतर्फे स्पष्टीकरण दिले आहे.

आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, विरोधकांना विरोध करण्याशिवाय दुसरे काही राहिलेले नाही. फक्त छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्थळाच्या कामाला स्थगिती देण्यात आलेली नाही. महाविकास आघाडी सरकारने या आर्थिक वर्षात ज्या ज्या ठिकाणी कामांना मंजुऱ्या दिल्या त्या मंजुऱ्या तपासण्यासाठी स्थगिती दिलेल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Eknath Shinde | Rajesh Kshirsagar
एकनाथ शिंदे गटाचा पहिला विजय : पंढरपूरच्या टाकळी ग्रामपंचायतीवर मिळवली एकहाती सत्ता

ते पुढे म्हणाले की, छत्रपती शाहू महाराजांनी जगाला समतेची शिकवण दिली. आपण त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन जगत आहोत. त्यांचे नियोजनबद्ध काम. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यासाठी केलेले काम, हे आपण पाहत आहोत. अशा थोर राजाच्या समाधी स्थळाच्या कामालाच स्थगिती दिलेली नाही. छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्थळाला ठाकरे सरकारने 10 कोटी दिले असतील आणि हे काम पूर्ण करण्यासाठी 50 कोटी खर्च येणार असेल तरीही राज्यसरकार निधी देऊन ते काम पूर्ण करून घेईल, असे त्यांनी सांगितले.

उगीच समाजामध्ये समभ्रम पसरविण्याचे काम विरोधाकांनी करू नये. शिंदे सरकार हे हिंदुत्त्ववादी व सर्वसामान्यांच्या भावना जाणून घेणारे आहे. याची प्रचिती लवकरच येईल. लोकशाहीत आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. कोणी कशा विरोधात आंदोलन करावे हे ज्याचे त्याने ठरवावे. आमचे सरकार छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्थळा बरोबरच राज्यातील थोर पुरुषांच्या समाधी व स्मारकांची सर्व कामे करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Eknath Shinde | Rajesh Kshirsagar
एकनाथ शिंदे संघर्षाच्या पवित्र्यात : ‘अंगावर आले तर शिंगावर घ्या; समर्थकांना सूचना!’

कोण काय इशारा देतो त्याला आम्ही महत्त्व देत नाही. इशारा देणे, आंदोलन करणे हा त्यांचा हक्क आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 15 ते 20 ऑगस्टच्या दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा भव्य असेल, असे त्यांनी सांगितले.

आम्ही एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेलो त्याच वेळी आम्ही निश्चित केले की, ठाकरे घराण्या विरुद्ध बोलणे उचित नाही. त्या घराण्याचा अवमान होईल असे आम्ही वागणार नाही. माझ्या सारखा 36 वर्षे शिवसेनेत अखंडपणे काम करणारा कार्यकर्ता शिंदेंच्या बरोबर जातो. त्यावेळी निश्चितपणे या गोष्टीचा विचार करणे गरजेचे होते. आदित्य ठाकरेंचा कोल्हापूर दौरा झाला त्यावेळी मी मुंबईत होतो. त्यामुळे त्याविषयी मला माहिती नाही. विकासासाठी आम्ही शिंदेच्या बरोबर आहोत. शिंदे हे माझे राजकीय गुरू आहेत. पुढील काळात राज्याचा विकास केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत, असे मत त्यांनी मांडले.

Eknath Shinde | Rajesh Kshirsagar
बिहारमध्येही 'एकनाथ शिंदें'चा शोध; पासवानांच्या दाव्यानं खळबळ

उदय सामंतांच्या वाहनावरील हल्ल्याबाबत त्यांनी सांगितले की, हा हल्ला पूर्व नियोजित होता, असे मला वाटत नाही. त्या संदर्भात तपास सुरू आहे. शिवसैनिक हे लढाऊ वृत्तीचे आहेत. शिवसैनिकांबाबत असे काही होऊ नये अशी माझी भावना आहे. राज्य भर मुख्यमंत्री शिंदे दौरे करत आहेत. त्यांच्या दौऱ्याला प्रतिसाद मिळत आहे. पूर्व शिवसेना नेत्यांचे एवढे स्वागत झाल्याचे पहायला मिळालेले नाही. शिंदे यांच्या नेतृत्त्वाला जनतेने स्वीकारले आहे. हजारो नागरिक रस्त्यावर उतरून त्यांचे स्वागत करताना दिसत आहेत. हीच स्थिती कोल्हापूरमध्येही दिसेल. कोल्हापूरमध्ये कडवट शिवसैनिक हा एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहे. सुरवातीला गैरसमज होते. मात्र त्यांनी विधानसभेत केलेले भाषण व आम्ही शिवसैनिकांशी साधलेला संवाद यामुळे त्यांना खरे कळाले आहे. शिंदे यांनी केलेली क्रांती ही योग्य आहे. असे शिवसैनिकांचे मत आहे, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com