Satara : देसाईंच्या मतदारसंघात शिंदे गटाला मिळाली पहिली ग्रामपंचायत...

पाटण Patan मतदारसंघाचे आमदार MLA व मुख्यमंत्री शिंदे Eknath shinde गटाचे नेते शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांच्या मतदारसंघात हा विजय मिळाला आहे.
Eknath shinde, Shambhuraj Desai
Eknath shinde, Shambhuraj Desaisarkarnama

कराड : पाटण विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या कराड तालुक्यातील उत्तर तांबवे ग्रामपंचायतीत तब्बल 22 वर्षांनंतर सतांत्तर घडले. शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघातील या ग्रामपंचायतीच्या निकालाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला राज्यातील पहिल्याच ग्रामपंचायतीत सत्ता मिळाली आहे.

पाटण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व मुख्यमंत्री शिंदे गटाचे शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात हा विजय मिळाला आहे. उत्तर तांबवे येथे सत्ताधारी भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल आणि जय हनुमान ग्रामविकास पॅनेल यांच्यात लढत झाली.

Eknath shinde, Shambhuraj Desai
Sambhuraj Desai Video : कर नही तो डर क्यू ! शंभूराज देसाई

युवा उद्योजक सचिन पवार यांच्या नेतृत्वाखालील जय हनुमान ग्राम विकास पॅनेलने 4-3 असे सत्तांतर करत विजय मिळवला. उत्तर तांबवे येथील ग्रामपंचायत सत्ताधारी पाटणकर गटाला तीन जागांवर समाधान मानावे लागले. तर आमदार शंभूराजे देसाई व रयत कारखान्याचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील यांच्या गटाने चार जागा मिळवत सत्तांतर घडवले.

Eknath shinde, Shambhuraj Desai
Patan : आदित्य ठाकरे शंभूराज देसाईंवर बरसले... राजीनामा देऊन निवडून येऊन दाखवा...

ग्रामपंचायत निवडणूक निकाल पुढीलप्रमाणे : सर्व साधारण गट- विजयी रोहित चव्हाण 98), पराभूत- सागर चव्हाण (89), विजयी -जयसिंग पाटील (120), पराभूत- प्रकाश पाटील (84), विजयी – शशिकांत चव्हाण (103), पराभूत -अजय पवार (57), अनुसूचित जाती स्त्री राखीव विजयी- विद्या साठे (94), पराभूत -अश्विनी कारंडे (92), सर्वसाधारण स्त्री गट -विजयी रूपाली पवार (116), पराभूत जयश्री पवार (93), विजयी-बानुबी मुल्ला (107), पराभूत- बेबी मुल्ला (97) विजयी भारती चव्हाण (102), पराभूत वनिता चव्हाण (58).

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in