'शेट्टीसाहेब, आमच्या सरकारला अजूनही तुमचा पाठिंबा आहे, असे आम्ही समजतो...'

शांतीसागर महाराजाची शताब्दी चांगली जोरदारपणे करू आणि तुम्हाला निमंत्रित करू : जयंत पाटील
'शेट्टीसाहेब, आमच्या सरकारला अजूनही तुमचा पाठिंबा आहे, असे आम्ही समजतो...'
Raju Shetti- Jayant Patil Sarkarnama

सांगली : राजू शेट्टीसाहेब (Raju Shetti), तुमचा आमच्या सरकारला अजूनही पाठिंबा आहे, असे माझा समज आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एकप्रकारे मनधरणीच केली. (Shetti saheb, we understand our government still has your support : Jayant Patil)

दक्षिण भारत जैन समाजाचे शंभरावे अधिवेशन सांगलीत आयोजित करण्यात आले होते. त्याच्या समारोपाच्या कार्यक्रमात जयंत पाटील बोलत होते. ते म्हणाले की, शांतीसागर महाराजांची शताब्दी २०२४ ला साजरी करण्याची गरज आहे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. निश्चितपणे राजू शेट्टीसाहेब आपण चांगल्या पद्धतीने साजरी करू. त्यात काही अडचण येणार नाही. सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला हा शब्द देतो.

Raju Shetti- Jayant Patil
‘दामाजी’च्या निवडणुकीत आम्हाला कुणी गृहीत धरू नये : परिचारक समर्थकांचा आमदार आवताडेंना इशारा

शांतीसागर महाराजाची शताब्दी चांगली जोरदारपणे करू आणि तुम्हाला निमंत्रित करू. अजितदादा राज्याचे अर्थमंत्री आहेत, त्यांना माझी विनंती आहे की, समडोळी हे माझ्या मतदारसंघातील गाव आहे. त्या गावात आपल्या शांतीसागर महाराजांचा शताब्दी महोत्सव साजरा करताना कोणतीही कमतरता येणार नाही, एवढ्या चांगल्या पद्धतीने सरकार पुढाकार घेऊन काम करेल, यात काही शंका नाही. अजितदादा त्याला नक्की मदत करतील, असा माझा विश्वास आहे, असेही जयंत पाटील यांनी विश्वास व्यक्त केला.

Raju Shetti- Jayant Patil
हर्षवर्धन पाटलांना २० वर्षांत जमलं नाही, ते भरणेंनी दुसऱ्याच टर्ममध्ये करून दाखवलं!

स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यांनतर देशाच्या उभारणीत फार मोठे काम जैन समाजाने केलेले आहे, असे कौतुक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या वेळी जैन समाजाचे केले.

जैन समाजाच्या प्रश्नावर मंत्रालयात लवकरच बैठक : अजितदादा

शंभराव्या अधिवेशनाच्या निमित्ताने जैन समाजाला शब्द देतो की, विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या जुलै महिन्यात आहे. त्या अगोदर मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जैन समाजाच्या प्रश्नांवर समाजातील प्रमुख व्यक्तींच्या उपस्थितीत मंत्रालयात एक बैठक घेण्यात येईल. जैन समाजासाठी जे जे करणे शक्य आहे, ते सर्व करण्यासाठी मी यत्किंचितही कमी पडणार नाही. असा शब्द मी तुम्हा सर्वांना देतो. भारतातील कोणत्याही राज्यात जैन समाजाला मिळणाऱ्या सुविधा या आपल्या राज्यात देण्यासाठी आम्ही मागेपुढे बघणार नाही, असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अधिवेशनात बोलताना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in