माणमध्ये राष्ट्रवादी-भाजप अभद्र युती; रामराजे जिल्ह्याला लागलेला 'कॅन्सर'

त्यापैकी शिवसेनेचे Shivsena नेते शेखर गोरे Shekhar Gore व राष्ट्रवादीचे Nationalist congress उमेदवार मनोज पोळ Manoj Pol यांना प्रत्येकी ३६ मते मिळाली. त्यामुळे ईश्वर चिठ्ठीव्दारे निकाल काढण्यात आला. त्याचा कौल शेखर गोरे यांना मिळाल्याने त्यांना विजयी घोषित केले.
माणमध्ये राष्ट्रवादी-भाजप अभद्र युती; रामराजे जिल्ह्याला लागलेला 'कॅन्सर'
Shekhar Gore, Ramraje Naik Nimbalkarsarkarnama

दहिवडी : माणमध्ये राष्ट्रवादी व भाजपने अभद्र युती केली होती. रामराजे हा सातारा जिल्ह्याला लागलेला कॅन्सर आहे, अशी जळजळीत टीका शिवसेनेचे नेते व जिल्हा बँकेचे माण सोसायटीतील विजयी उमेदवार शेखर गोरे यांनी केली आहे.

सर्वांचेच लक्ष लागलेल्या माण सोसायटी मतदारसंघाची निवडणूक अटीतटीची झाली. एकुण ७४ मतांपैकी प्रत्यक्ष ७२ मतदान झाले. त्यापैकी शिवसेनेचे नेते शेखर गोरे व राष्ट्रवादीचे उमेदवार मनोज पोळ यांना प्रत्येकी ३६ मते मिळाली. त्यामुळे ईश्वर चिठ्ठीव्दारे निकाल काढण्यात आला. त्याचा कौल शेखर गोरे यांना मिळाल्याने त्यांना विजयी घोषित केले. त्यानंतर काढलेल्या विजयी मिरवणुकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला.

Shekhar Gore, Ramraje Naik Nimbalkar
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पोपट रोज बोलतो आहे, देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

शेखर गोरे म्हणाले, या निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजपची अभद्र युती झाली. परंतु, त्यांची मते फुटली, यात राष्ट्रवादीची जास्त मते फुटली. रामराजे नाईक-निंबाळकर हे सातारा जिल्ह्याला लागलेला कॅन्सर असून तो जोपर्यंत बरा होत नाही, तोपर्यंत माणमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचा आमदार होऊ शकत नाही.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in