Maan : शेखर गोरे आक्रमक; कोरेगावला एमआयडीसी नेल्यास मंत्रालयावर मोर्चा काढणार

शेखर गोरे Shekhar Gore म्हणाले, कित्येक वर्षे सामान्य नागरिकांसह लोकप्रतिनिधी माण तालुक्यात Maan Taluka एमआयडीसी MIDC यावी यासाठी प्रयत्न करीत आहेत.
Shekhar Gore
Shekhar Goresarkarnama

सातारा : माण तालुक्याला मंजूर असलेली एमआयडीसी कोरेगावला नेण्याचा या सरकारचा डाव आहे. सरकार कोणाचे ही असो, माणच्या विकासामध्ये कोणी आडवे येत असेल तर सामान्य नागरिकांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासह मंत्रालयावर मोर्चा काढू, असा इशारा शिवसेना नेते शेखर गोरे यांनी दिला आहे.

म्हसवड येथील एमआयडीसीला स्थगिती देऊन कोरेगाव भागातच ती उभारण्याचा फलटण, कोरेगाव येथील लोकप्रतिनिधींनी घाट घातला आहे. म्हसवड ऐवजी कोरेगाव येथेच एमआयडीसी उभारण्याबाबत मुंबई येथे संबंधित कार्यालयात वरिष्ठस्तर अधिकाऱ्यांची बैठक आज होणार होती. मात्र, याबाबतची संभाव्य अडचण लक्षात घेऊन आजची बैठकच रद्द करून ती उद्या (गुरुवारी) ठेवण्यात आली आहे.

Shekhar Gore
मी अगदी शेवटच्या क्षणीही त्यांना विचारलं होतं...; उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट

गेली कित्येक वर्षे माण तालुक्याचा विकास खुंटला आहे. माण तालुक्यातील मंजूर एमआयडीसी कोरेगाव तालुक्यात नेण्यासंदर्भात मंत्रालयात बैठक होणार असल्याचे समल्यानंतर शिवसेना नेते शेखर गोरे आक्रमक झाले आहेत. माण तालुक्यातील एमआयडीसी कोरेगावला नेल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासह मंत्रालयावर मोर्चा काढू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Shekhar Gore
सातारा जिल्ह्यातील शिवसैनिक उद्धवजींच्या पाठीशी... शेखर गोरे

शेखर गोरे म्हणाले, कित्येक वर्षे सामान्य नागरिकांसह लोकप्रतिनिधी माण तालुक्यात एमआयडीसी यावी यासाठी प्रयत्न करीत आहेत. मंजूर एमआयडीसी कोरेगावला नेण्याचा या सरकारचा डाव आहे. सरकार कोणाचे ही असो, माणच्या विकासांमध्ये कोण आडवे येत असेल तर सामान्य नागरिकांना बरोबर घेऊन सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासह मंत्रालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा शिवसेना नेते शेखर गोरे यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in