शेखर गोरेंचे नशीब जोरात चिट्ठीवर गेले जिल्हा बॅंकेत

शेखर गोरे यांच्या या विजयाने सहा वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीची आठवण झाली.
शेखर गोरेंचे नशीब जोरात चिट्ठीवर गेले जिल्हा बॅंकेत
Shekhar Goresarkarnama

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Satara District Bank Election) संचालक मंडळाच्या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल समोर येत आहेत. त्यामध्ये ओबीसी मतदार संघातून शिसेनेचे शेखर गोरे (Shekhar Gore) पराभूत झाले होते. मात्र, माण सोसायटी मतदारसंघातून त्यांना विजय मिळाला. माण सोसायटी गटात गोरे यांनी सर्वसमावेशक सहकार पॅनेलचे उमेदवार मनोज सदाशिवराव पोळ यांना पराभूत केले. दोघांनाही प्रत्येकी ३६-३६ मते मिळाल्यामुळे चिठ्ठी टाकण्यात आली. शेखर गोरे यांचे नशीब आज रोजात होते त्यामुळे चिठ्ठीचा कौल त्यांना मिळाला. त्यामुळे गोरे चिट्ठीवर जिल्हा बॅंकेत गेले.

Shekhar Gore
शिंदेंचा पराभव करणाऱ्या रांजणेंनी शिवेंद्रराजेंना केला विजय अर्पण; राजकीय चर्चांना उधाण

आजच्या निकालातही त्यांना एका मतदार संघात पराभवाल सामोरे जावे लागले. मात्र, दुसऱ्या मतदार संघात समान मते पडल्यामुळे चिट्ठीवर त्यांचा विजय झाला. दरम्यान, माण सोसायटी मतदारसंघातून विद्यमान संचालक आमदार जयकुमार गोरे, शिवसेनेचे शेखर गोरे व राष्ट्रवादीचे मनोज पोळ यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. जवळपास वर्षभरापूर्वीच मनोज पोळ यांनी जिल्हा बॅंकेची निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी लोधवडे येथे मतदार व कार्यकर्त्यांची बैठक घेवून मनोज पोळ यांची उमेदवारी जाहीर केली होती. तर कोणत्याही परिस्थितीत जिल्हा बँकेत संचालक म्हणून जायचेच असा निर्धार करुन निवडणुकीची तयारी केली होती. आमदार गोरे हे निवडणूकीच्या मैदानात असणारच याबद्दल कोणालाही शंका नव्हती.

अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेवून आमदार गोरे यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. पण त्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणूकीत रंगत वाढली. दुसरीकडे मनोज पोळ हे राष्ट्रवादीकडे असलेल्या वीसपेक्षा कमी मतांच्या पाठबळावर निवडणुकीला सामोरे जात होते. यात त्यांना अनिल देसाई यांच्या दोन मतांची मदत मिळणार होती. पण शेखर गोरे व मनोज पोळ या दोघांची खरी भिस्त आमदार गोरे यांच्याकडे असलेल्या मतांवर होती. मनोज पोळ यांच्याकडील मते दिवसेंदिवस कमी होत असल्याची तर शेखर गोरे यांच्याकडील मतांमध्ये वाढ झाल्याची चर्चा मतदानाच्या दिवसापर्यंत सुरू होती. आमदार गोरे नक्की कोणाला साथ देतील याबद्दल सुध्दा उत्सुकता होती. दोघांकडूनही चाळीस ते बेचाळीस मते मिळतील असा दावा केला जात होता.

Shekhar Gore
शेखर गोरेंचा दणकून पराभव; राष्ट्रवादीच्या प्रदीप विधातेंचा मोठा विजय

मनोज पोळ यांना राष्ट्रवादीची १६, अनिल देसाई यांची २ व आमदार गोरे यांची २६ मते मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र आमदार गोरे समर्थक दोघे मतदानाला गैरहजर राहिले. परंतू अपेक्षित बेचाळीस पैकी फक्त ३६ मते मनोज पोळ यांना मिळाली. मात्र शेखर गोरे यांनी आमदार गोरे यांच्या मतांनाही भगदाड पाडले. शेखर गोरे यांनी एकाकी झुंज देत ३६ मतापर्यंत मजल मारुन सर्वांना आश्चर्यचकित केले. या विजयानंतर शेखर गोरे यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून, फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार जल्लोष केला.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in