koregaon APMC : शशिकांत शिंदेंचे वर्चस्व कायम; महेश शिंदेंचा दारुण पराभव

NCP Unity in Koregaon कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेते, कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने निकाल लागल्याची भावना कार्यकर्त्यांची हाोती.
Mahesh Shinde, Shashikant Shinde
Mahesh Shinde, Shashikant Shindesarkarnama

-पांडुरंग बर्गे

Koregaon News : कोरेगाव तालुका बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी सहकार विकास पॅनलने १८ पैकी १६ जागा मोठ्या मताधिक्याने जिंकत बाजार समितीवरील आपली सत्ता कायम ठेवली. तर आमदार महेश शिंदे Mahesh Shinde यांच्या नेतृत्वाखालील कोरेगाव तालुका शेतकरी विकास आघाडी पॅनेलचा दारुण पराभव केला. त्यांना केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले.

कोरेगाव बाजार समितीच्या निवडणुकीसाठी काल ९५ टक्के मतदान झाले होते. आज सकाळी दहा वाजता कोरेगाव बाजार समितीच्या आवारातील गीताई मंगल कार्यालयात मतमोजणी होऊन दुपारपर्यंत सर्व निकाल जाहीर करण्यात आले. प्रारंभी हमाल व मापाडी मतदारसंघातील एका जागेची मतमोजणी झाली.

त्यात प्रथम स्वतंत्र उमेदवार म्हणून उभ्या राहिलेल्या परंतु, नंतर आमदार महेश शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची छायाचित्रे वापरून पत्रक काढून प्रचार केलेले संजय गोरख बर्गे यांनी आपले प्रतिस्पर्धी स्वतंत्र उमदेवार दत्तात्रय विश्वनाथ गाडे यांच्यावर केवळ दोन मतांनी विजय मिळवला. त्यांना ५५, तर श्री. गाडे यांना ५३ मते मिळाली. त्यानंतर व्यापारी आणि अडते मतदारसंघातील दोन जागांवर "शेतकरी सहकार"चे राहुल सुधाकर बर्गे (३०६) व "शेतकरी विकास"चे सुनील ज्योतिर्लिंग निदान (२९५) हे विजयी झाले.

Mahesh Shinde, Shashikant Shinde
Koregaon APMC News : मी आणि शशिकांत शिंदेंनी उत्तरे द्यायची; बाकीच्यांनी निवांत राहायचे : रामराजे संतापले

सहकारी सोसायटी मतदारसंघातील सात जागांवर "शेतकरी सहकार"चे ॲड. पांडुरंग चंद्रकांत भोसले (५९२), कल्याण किसन भोसले (५८९), जयवंत साहेबराव घोरपडे (५८७), राहुल शिवाजी निकम (५८७), दिलीप शामराव अहिरेकर (५७१), प्रमोद लक्ष्मण धुमाळ (५७०) व अधिक दत्तात्रय माने (५५७) हे विजयी झाले.

Mahesh Shinde, Shashikant Shinde
Koregaon APMC News : कोरेगावात महेश शिंदे-शशिकांत शिंदेंच्या गटात काट्याची टक्कर

महिला राखीव मतदारसंघातूनही "शेतकरी सहकार"च्याच वैशाली हणमंतराव भोसले (५९९) व साधना संजय चव्हाण (५९२) या विजयी झाल्या. इतर मागास प्रवर्ग राखीव मतदारसंघातूनही "शेतकरी सहकार"चे ॲड. अमोल रत्नाकर राशिनकर (६१६), विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघातूनही "शेतकरी सहकार"चे केशव बाळकृष्ण मदने (६२१) विजयी झाले.

Mahesh Shinde, Shashikant Shinde
Satara News : केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीकडे अधिकाऱ्यांचे दूर्लक्ष; मंत्री भागवतांचा कारवाईचा इशारा

ग्रामपंचायत मतदारसंघातील सर्वसाधारण दोन जागांवर "शेतकरी सहकार"चे बापूसाहेब पांडुरंग चव्हाण (६७१) व विशाल विष्णू शिंगटे (५९९), आर्थिकदृष्ट्या दुर्बल मतदारसंघातून आनंद विठ्ठल जाधव (६१९) व अनुसूचित जाती जमाती राखीव मतदारसंघातून गोविंद चंद्रकांत कदम (६४९) हे विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोरेगावच्या सहायक निबंधक प्रीती काळे यांनी काम पाहिले.

Mahesh Shinde, Shashikant Shinde
Ajit Pawar News : 'सत्ता गेल्यामुळे ..'; अजित पवारांना कसली खंत वाटते ? म्हणाले..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com