साताऱ्याच्या दोन राजांना शशीकांत शिंदे दणका देणार?

दोन्ही आघाड्यांतील नाराजांना आमदार शिंदे Shashikant Shinde यांनी तिसरा पर्याय Third Option देण्याची तयारी गेल्या वर्षभरापासून सुरू ठेवली आहे. त्याला कोरेगाव Koregaon विधानसभा, जिल्हा बँक, DCC Bank, कोरेगाव नगर पंचायत Nagarpanchayat या तीन निवडणुकींच्या पराभवाची किनार आहे.
Shashikant Shinde, Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
Shashikant Shinde, Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosalesarkarnama

सातारा : सातारा पालिकेच्या निवडणुकीसाठी दोन राजांच्या आघाडींशिवाय तिसरा पर्याय देण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार शशीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. आता त्यांना पक्षादेशाची प्रतिक्षा असून माजी नगरसेवकांसोबत झालेल्या बैठकीनंतर अनेकांनी त्यांच्याशी संपर्क करून महाविकास आघाडीचे पॅनेल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे शशीकांत शिंदे साताऱ्यातील नाराजांची मोट बांधून पॅनेल उभे करणार हे निश्चित झाले आहे. त्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ग्रीन सिग्नलची प्रतिक्षा बाकी आहे.

सातारा पालिकेची आजपर्यंतची निवडणूक ही खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले याच्या दोन आघाड्यातच झाली आहे. मध्यंतरी राजेंद्र चोरगे यांनी तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न केला, पण सातारकरांनी त्यांना साथ दिली नाही. सध्या पालिका निवडणुक कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेहमी प्रमाणे साताऱ्याचे दोन्ही राजांच्या आघाड्यातील नेते मंडळी सक्रिय झाले आहेत.

Shashikant Shinde, Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
वैरत्व विसरून उदयनराजे, बाळासाहेब पाटील यांची बंद खोलीत चर्चा...

पण, दोन्ही आघाड्यांतील नाराजांना राष्ट्रवादीचे आमदार शशीकांत शिंदे यांनी तिसरा पर्याय देण्याची तयारी गेल्या वर्षभरापासून सुरू ठेवली आहे. त्याला कोरेगाव विधानसभा, जिल्हा बँक, कोरेगाव नगर पालिका या तीन निवडणुकींच्या पराभवाची किनार आहे. कोरेगावातून पराभूत झाल्यानंतर शशीकांत शिंदेंनी जावळी तालुक्यात लक्ष घातले. कारण सातारा-जावळीतून सध्या भाजपचे आमदार म्हणून शिवेंद्रसिंहराजे भोसले निवडून आलेले आहेत.

Shashikant Shinde, Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
सातारा पालिका निवडणूकीत महाविकासचा फॉर्मूला; राष्ट्रवादी ताकदीने उतरणार : शशिकांत शिंदे

त्यामुळे येथून निवडणूक लढता येईल व ती सोपी असेल, या भावनेतून आमदार शिंदेंनी जावळीत लक्ष घातले. त्यावरून शशीकांत शिंदे व शिवेंद्रसिंहराजे यांच्यात कलगीतूरा रंगला. परिणामी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शशीकांत शिंदेंविरोधात शिवेंद्रसिंहराजेंनी ज्ञानदेव रांजणे हा नवखा उमेदवार देऊन काठावरच्या मताधिक्क्याने निवडून आणला. त्यामुळे जिल्हा बँकेत शशीकांत शिंदेंना पराभूत व्हावे लागले.

Shashikant Shinde, Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
यापुढे जावळीत अधिक लक्ष देणार : शशीकांत शिंदे

सध्या दोन राजांच्या आघाड्यांविषयी नाराज असलेल्यांना सोबत घेऊन तिसरा पर्याय देण्याची तयारी शशीकांत शिंदेंनी केली आहे. त्यासाठी काही माजी नगरसेवकांसोबत नुकतीच त्यांची बैठक झाली. सातारकरांना तिसरा पर्याय देण्यासाठी तुम्ही नेतृत्व करावे, अशी मागणी या माजी नगरसेवकांनी केली आहे. या बैठकीनंतर आमदार शिंदेंना यांना अनेकांनी संपर्क करून तिसरा पर्याय देणार असतील तर त्यांना साथ देण्याची तयारी दर्शवली आहे.

Shashikant Shinde, Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
उदयनराजे म्हणतात मी संजय राऊतांना ओळखत नाही... राजघराण्याबद्दल बोललं तर याद राखा....

त्यामुळे शशीकांत शिंदे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सातारा पालिकेची निवडणूक लढण्याबाबतच्या हिरव्या कंदीलाची वाट पहात आहेत. यासंदर्भात पुढील जूनच्या अखेरीस राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सोबत जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बैठक होणार आहे. या बैठकीत सातारा पालिकेत पॅनेल टाकण्याबाबत पक्षश्रेष्टींकडून निर्णय घेतला जाणार आहे.

Shashikant Shinde, Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
दोन राजेंना सत्तेबाहेर करण्याचा शिंदेंचे निर्धार : 'सातारा शहर महाविकास आघाडी' मैदानात

त्यानंतर शशीकांत शिंदे महाविकास आघाडीच्या माध्यमातून तिसरा पर्याय सातारकरांपुढे ठेवणार आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेच्या नेत्यांशी संपर्क ठेऊन आहेत. यासंदर्भात आमदार शशीकांत शिंदे म्हणाले, काही माजी नगरसेवकांसोबत झालेल्या बैठकीनंतर सातारा शहरातून अनेकांनी माझ्याशी संपर्क केला आहे. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून तिसरा पर्याय देणार आहोत. त्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच्या बैठकीची आम्ही वाट पहात आहोत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in