Koregaon : शशिकांत शिंदेंचा महेश शिंदेंवर निशाणा...रस्त्याचे काम थांबविण्यासाठी कुणी दबाव टाकला...

आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde म्हणाले, सातारा-पंढरपूर-टेंभूर्णी Satara Pandharpur महामार्गाचे काम आमच्या कार्यकाळात मंजूर करुन घेतले होते. काही ठिकाणी मुद्दाम आडकाठी आणण्याचे उद्योगही इथल्या लोकप्रतिनिधींनी केले.
Mahesh Shinde, Shashikant Shinde
Mahesh Shinde, Shashikant Shindesarkarnama

पुसेगाव : अनेक महिने रखडलेले येथील महामार्गाचे काम आमच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण आंदोलन करताच सुरु झाले होते. प्रांत, तहसिलदारांनी ते काम पूर्ण होईपर्यंत बंद करायला नको होते, मात्र सुरु असलेले रस्त्याचे काम थांबविण्यासाठी तहसिलदारांवर कुणी दबाव टाकला हे जनतेला माहित आहे. आता पुसेगावकरांच्या रास्ता रोकोनंतर सुरु झालेले काम रथोत्सवापूर्वी पूर्ण करण्याची सद्बुद्धी अधिकाऱ्यांना आणि ठेकेदाराला मिळावी, अशी अपेक्षा आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

याविषयी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, सातारा-पंढरपूर-टेंभूर्णी महामार्गाचे काम आमच्या कार्यकाळात मंजूर करुन घेतले होते. या रस्त्याच्या कामात अनेक अडथळे आल्याने काम संथ गतीने झाले. काही ठिकाणी मुद्दाम आडकाठी आणण्याचे उद्योगही इथल्या लोकप्रतिनिधींनी केले.

पुसेगावकरांसह प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन रस्त्याचे काम लवकर व्हावे, म्हणून आम्ही कायम पाठपुरावा केला. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर पुसेगाव बाजारपेठेला आणखी महत्त्व येणार आहे. मध्यंतरी गौणखनिज उत्खननावरुन रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीला कोट्यवधींचा दंड ठोठावण्यात आला. त्यांची यंत्रणा सील करण्यात आली.

Mahesh Shinde, Shashikant Shinde
Tata Airbus : शशिकांत शिंदे संतप्त; म्हणाले, आता बढाया मारणारे गप्प का...

कामे बंद राहिल्याने लोकांच्या अडचणी वाढल्या. आमच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आमरण उपोषण करताच पुसेगावातील रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली होती. इथल्या लोकप्रतिनिधींनी प्रांत, तहसीलदारांवर दबाव टाकून सुरु असलेले रस्त्याचे काम बंद पाडले. आता पुन्हा पुसेगावकरांनी आंदोलनाचे हत्यार उपसताच काम सुरु झाले आहे. श्री सेवागिरी महाराजांच्या कृपेने रथोत्सवापूर्वी हे काम पूर्ण व्हावे, अशी अपेक्षाही श्री. शिंदेंनी पत्रकात व्यक्त केली.

Mahesh Shinde, Shashikant Shinde
koregaon : शशिकांत शिंदे चिंतनात व्यस्त; महेश शिंदेंचा राष्ट्रवादीला 'दे धक्का'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com