पवार म्हणाले, शशिकांत शिंदेंनी निवडणूक गांभीर्यांने घ्यायला हवी होती...

राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांकडून शशिकांत शिंदे यांच्या पराभवावर दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
Sharad Pawar-Ramraje Naik Nimbalkar- Balasaheb Patil
Sharad Pawar-Ramraje Naik Nimbalkar- Balasaheb PatilSarkarnama

सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीत काल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा १ मताने पराभव झाला. ज्ञानदेव रांजणे यांच्यासारख्या अत्यंत नवख्या उमेदवाराकडून त्यांना पराभव स्विकारावा लागला. त्यांच्या पराभवानंतर आता राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांकडून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शिंदे यांच्या पराभवावर भाष्य केले आहे. "मी अद्याप त्यांच्या पराभवाचं कारण काय असू शकेल याच्या खोलात गेलेलो नाही. पण त्यांनी ही निवडणूक गांभीर्याने घ्यायला हवी होती" असे पवार यांनी म्हटले आहे.

शरद पवार यांनी काल जिल्ह्याचा दौरा करत शशिकांत शिंदे आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर महाबळेश्वर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळावा पार पडला. तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले, "सातारा जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला. मात्र, "मी अद्याप त्यांच्या पराभवाचं कारण काय असू शकेल याच्या खोलात गेलेलो नाही. पण त्यांनी ही निवडणूक गांभीर्याने घ्यायला हवी होती"

Sharad Pawar-Ramraje Naik Nimbalkar- Balasaheb Patil
भाजपच्या साथीने राष्ट्रवादीच्या सहकारमंत्र्यांनी उधळला गुलाल

विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनीही शशिकांत शिंदेंच्या पराभवावर दुःख व्यक्त केले आहे. "मी विजयाचा शिल्पकार असलो तरी शशिकांत शिंदेंसारखा आमचा ज्येष्ठ सहकारी पडला याचे दु:ख आहे. आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला. जिल्हा एकसंघ राहावा, बॅंक एकसंघ राहावी, याला महत्व दिले. आमच्या पॅनेलचा विजय झाला असला तरी गड आला पण सिंह गेला. अशी परिस्थिती झाली आहे. एका ज्येष्ठ सहकाऱ्याचा पराभव व्हावा, हे दुर्दैवी आहे", अशी प्रतिक्रिया रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.

Sharad Pawar-Ramraje Naik Nimbalkar- Balasaheb Patil
शशिकांत शिंदेंना धूळ चारणारे ज्ञानदेव रांजणे आहेत तरी कोण?

तसेच शशिकांत शिंदे गाफील राहिल्यामुळे त्यांचा पराभव झाला. आम्ही सर्व नेत्यांनी त्यांच्यासाठी प्रयत्न केले; पण त्यामध्ये यश आले नाही. अशी प्रतिक्रिया सातारचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com