शशीकांत शिंदे म्हणाले, काहींच्या स्वभावाला औषध नाही
Shashikant Shinde, Mahesh Shindesatara reporter

शशीकांत शिंदे म्हणाले, काहींच्या स्वभावाला औषध नाही

शशीकांत शिंदे Shashikant shinde म्हणाले, नगरपंचायत Nagarpanchyat election निवडणुकीत राष्ट्रवादीला Nationalist congress चांगले वातावरण आहे. ही निवडणूक लोकांनीच हातात घेतली आहे. सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना आम्ही संधी देऊन नवीन चेहरे दिले आहेत.

सातारा : नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी करून लढायचे अशी आमची इच्छा होती. पण, काही लोकांचा स्वभाव आपण बदलू शकत नाही. आम्ही स्थानिक पातळीवर निर्णय घेतला. त्यामुळे कोरेगाव नगरपंचायतीत काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत. त्यामुळे नगरपंचायतींचा चांगला निकाल लागून जिल्ह्यात राष्ट्रवादीला चांगले यश मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे आमदार शशीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी आज ओबीसींच्या जागांसाठी मतदान झाले. यावेळी आमदार शशीकांत शिंदे व आमदार महेश शिेंदे दोघेही ठाण मांडून होते. एकुणच या निवडणुकीविषयी आमदार शशीकांत शिंदेंना पत्रकारांनी बोलते केले. शशीकांत शिंदे म्हणाले, ''नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगले वातावरण आहे. ही निवडणूक लोकांनीच हातात घेतली आहे. सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना आम्ही संधी देऊन नवीन चेहरे दिले आहेत.

Shashikant Shinde, Mahesh Shinde
शिवसेना सोडण्याविषयी महेश शिंदे म्हणतात...

मागील काही वर्षांच्या नगरपंचायतीच्या कारभारावर लोकांत नाराजी होती. आम्ही चांगला प्रचार केला, त्यामुळे लोकांचा पाठींबा मिळाला आहे. लोकांच्या आशिर्वादाने निकाला चांगला लागेल,'' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दिग्गज नेते कोरेगावात ठाण मांडून आहेत, या विषयी आमदार शिंदे म्हणाले, ''कार्यकर्त्यांना जोश येण्यासाठी आम्ही थांबलो आहोत.'' जिल्ह्यात राष्ट्रवादीची परिस्थिती सांगताना शशीकांत शिंदे म्हणाले, ''पाटण, कोरेगाव, खंडाळा, लोणंद, वडुज, दहिवडी या सहा ठिकाणी निवडणूक होत असून येथे राष्ट्रवादीला चांगले यश येईल, आशा आहे.''

Shashikant Shinde, Mahesh Shinde
राष्ट्रवादीनेच महाविकास आघाडी तोडली; कोरेगावचे वाटोळे करणाऱ्यांना जनता हद्दपार करणार....

महाविकास आघाडीतील तीनही पक्षांच्या नेत्यांनी स्थानिक पातळीवर स्वतंत्र निर्णय घ्या, अशी सूचना केली होती, असे सांगून शशीकांत शिंदे म्हणाले, ''आम्ही निर्णय घेतला. महाविकास आघाडी करून लढायचे, अशी आमची इच्छा होती. पण, काही लोकांचा स्वभाव आम्ही बदलू शकत नाही. कोरेगाव नगरपंचायतीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढत आहे.''

Shashikant Shinde, Mahesh Shinde
या तीन चुकांमुळे शशीकांत शिंदेंचा झाला पराभव....

जिल्हा बँकेत फसवणूक झाली, त्याच्या अनुषंगाने या निवडणुकीत काय परिणाम दिसेल, या विषयी विचारले असता आमदार शिंदे म्हणाले, ''ती निवडणूक वेगळी होती, ही स्थानिक पातळीवरील प्रश्नांची निवडणूक आहे. तरीही आपल्या लोकप्रतिनिधींवर अन्याय झाला, त्याचा फायदा होऊ शकतो.'' स्थानिक पातळीवर शिवसेनेचे वेगळी चूल मांडली आहे, या विषयी शशीकांत शिंदे म्हणाले, ''शिवसेनेने पहिल्यापासून चिन्हावर निवडणूक लढवण्याचे ठरवले होते. ती त्यांच्या पक्षाची भूमिका आहे. पण, पूर्णपणाने शिवसेनेचे पॅनेल कोरेगावात उभे राहिलेले दिसत नाही.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in