शशीकांत शिंदे म्हणतात की, माझी शिफारस कमी पडल्यानेच शिवेंद्रसिंहराजेंचे अध्यक्षपद हुकले...

कै. लक्ष्मणराव (तात्या) पाटील Laxmanrao Patil यांनी पक्षाशी बांधिलकी ठेवत शरद पवार Sharad Pawar यांच्या विचारांची पाठराखण केली होती. त्यामुळे त्यांच्या मुलाला श्री. पवार साहेब यांनी अध्यक्ष बनविलं आहे.
Shashikant Shinde, Shivendrarje Bhosale
Shashikant Shinde, Shivendrarje Bhosalesarkarnama

सातारा : मागील निवडणुकीवेळी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी शिवेंद्रसिंहराजेंच्या नावाची मीच पवार साहेबांकडे शिफारस केली होती. त्यामुळे ते अध्यक्ष झाले होते. पण यावेळेस जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माझाच पराभव झाल्याने माझ्या सारख्याची शिफारस कमी पडल्याने शिवेंद्रसिंहराजे अध्यक्ष होऊ शकले नाहीत, असा खोचक टोला आमदार शशीकांत शिंदे यांनी लगावला आहे.

जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदासाठी आमदार शिवेंद्रराजेंचे नाव वगळून खासदार शरद पवार यांनी नितीन पाटील यांना संधी दिली. बँकेचे नुतन अध्यक्ष नितीन (काका) पाटील यांना आमदार शशिकांत शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, सातारा जिल्हा बँकेत नेहमीच पक्ष विरहीत कामकाज चालत आले आहे. कै. लक्ष्मणराव (तात्या) पाटील यांनी पक्षाशी बांधिलकी ठेवत शरद पवार यांच्या विचारांची पाठराखण केली होती. त्यामुळे त्यांच्या मुलाला श्री. पवार साहेब यांनी अध्यक्ष बनविलं आहे. याचा आनंदच असुन कार्यकर्त्यांतही समाधानाचे वातावरण आहे. माझ्या पराभवानंतर कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या आणि याच शरद पवार साहेबांनी ओळखल्या. त्यामुळेच नितीन पाटील यांना अध्यक्ष बनविल्याची भावना आमदार शिंदे यांनी बोलुन दाखवली.

Shashikant Shinde, Shivendrarje Bhosale
सातारा जिल्हा बँक नाबार्डच्या 'उत्कृष्ट कार्यक्षमता' पुरस्काराने सन्मानित

आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, मी निवडुन आलो असतो तर शिवेंद्रसिंहराजेंची शिफारस शरद पवार साहेबांच्याकडे करु शकलो असतो. या आधी शिवेंद्रसिंहराजे भोसले हे अध्यक्ष झाले होते. तेव्हा सुद्धा पवार साहेबांच्याकडे मीच शिफारस केली होती. यावेळी माझाच पराभव झाल्यामुळे माझ्यासारख्याची शिफारस कमी पडली. त्यामुळेच शिवेंद्रसिंहराजे अध्यक्ष होऊ शकले नाहीत, असा टोला ही आमदार शिंदे यांनी लागावलाय. तसेच शरद पवार यांना मी शिवेंद्रसिंहराजेंना जिल्हा बँकेचा अध्यक्ष करु नका, असे कधीच सांगितलं नसल्याचंही त्‍्‍यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com