शशिकांत शिंदेंना धक्का; पुतण्या सौरभचा एकनाथ शिंदे गटाला पाठींबा...

सौरभ शिंदे Saurabh Shinde यांना चुलते आमदार शशीकांत शिंदे MLC Shashikant shinde यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस NCP पक्षाचे बाळकडू मिळाले आहे.
Shashikant Shinde, Saurabh Shinde, Eknath shinde
Shashikant Shinde, Saurabh Shinde, Eknath shindesarkarnama

सातारा : शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिवसेंदिवस पाठींबा देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. माथाडी नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशीकांत शिंदे यांचे पुतणे सौरभ ऋषिकांत शिंदे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बाजूला ठेवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठींबा जाहीर केला आहे.

साताऱ्याचे सुपूत्र एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत राहून बंड पुकारले आणि ४० आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. आता साताऱ्यातील राष्ट्रवादीचे आमदार शशीकांत शिंदे यांचा पुतण्या सौरभ शिंदे यांनेही मुंबईत राहून सातारी बाणा दाखवून दिला आहे.

Shashikant Shinde, Saurabh Shinde, Eknath shinde
साताऱ्याच्या दोन राजांना शशीकांत शिंदे दणका देणार?

घणसोली येथील एका निवासी संकुलाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी यापूर्वीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यांच्यासमवेत बहुतांशी रहिवाशी व नवीन मुंबई येथील सुमारे ३५ नगरसेवकांनी ही जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापार्श्वभूमीवर सौरभ ऋषिकांत शिंदे यांनी ही भूमिका घेतली आहे.

Shashikant Shinde, Saurabh Shinde, Eknath shinde
एकनाथ शिंदे सरकारने पालकमंत्री स्थानिकच द्यावेत, ‘या’ सरपंचाची मागणी !

सौरभ शिंदे यांना चुलते आमदार शशीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाळकडू मिळाले आहे. वडील व माथाडी कामगार नेते ऋषिकांत शिंदे यांचेही त्याला मार्गदर्शन लाभले आहे.

Shashikant Shinde, Saurabh Shinde, Eknath shinde
यापुढे जावळीत अधिक लक्ष देणार : शशीकांत शिंदे

आपल्या जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे तांब या गावातील सर्वसामान्य माणूस मोठा होत असेल तर त्याला विरोध करण्यापेक्षा त्यांना पाठींबा दिला पाहिजे, या भावनेतून सौरभ शिंदे यांनी हा राजकिय निर्णय घेतला आहे. याचा त्यांना निश्चित फायदा होण्याचे संकेत मिळत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in