शशीकांत शिंदेच्या पराभवाने शरद पवारही नाराज : जिल्ह्यातील नेत्यांची झाडाझडती

शिंदे समर्थकांनी पराभवाच्या रागात राष्ट्रवादीचे कार्यालय फोडले.
शशीकांत शिंदेच्या पराभवाने शरद पवारही नाराज : जिल्ह्यातील नेत्यांची झाडाझडती
Sharad Pawarsarkarnama

सातारा : सातारा जिल्हा बॅंकेतील आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेसला जिव्हारी लागला आहे. साताऱ्याच्या दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मंगळवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहात शशिकांत शिंदे यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली. तसेच विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून निकालाचा लेखाजोखा घेतला. तसेच त्यांनी शिंदे यांच्या पराभवाबद्दल नेत्यांपुढे नाराजी व्यक्त केली.

Sharad Pawar
शशीकांत शिंदेंच्या ओठी अखेर ते नाव आलेच...

जावली सोसायटी मतदार संघातून राष्ट्रवादीच्या आमदार शशिकांत शिंदे यांचा बंडखोर उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांनी एका मताने पराभव केला. या पराभवाची गंभीर दखल राष्ट्रवादीने घेतली. शिंदे समर्थकांनी पराभवाच्या रागात राष्ट्रवादीचे कार्यालय फोडले. मंगळवारी सातारा जिल्हा दौर्‍यावर असणाऱ्या राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्हा बॅंक निकालात चार जागा हातून गेल्या तसेच आमदार शिंदे यांचा एका मतांनी पराभव झाला या पार्श्वभूमीवर कराडला जाण्याऐवजी सातारा शासकीय विश्रामगृहात सायंकाळी उशीरा थांबण्याचा निर्णय घेतला. या वेळी खासदार श्रीनिवास पाटील, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते.

Sharad Pawar
शशिकांत शिंदेंच्या पराभवावर अजित पवारांचे भाष्य...

विश्रामगृहाच्या अजिंक्यतारा दालनात आमदार शशिकांत शिंदे यांच्याशी पवार यांनी बंद खोलीत तासभर चर्चा केली. या भेटीत जिल्हा बॅंकेत झालेल्या पराभवाची कारणें व अनेक घडामोडींचा आढावा घेतल्या. शिंदे यांचा पराभव राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना चुटपूट लावून गेला आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी रात्री उशिरा शासकीय विश्रामगृहात येऊन पवारांची भेट घेतली. तसेच विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून निकालाचा लेखाजोखा घेतला. तसेच त्यांनी शिंदे यांच्या पराभवाबद्दल नेत्यांपुढे नाराजी व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in