शशिकांत शिंदेंचा ठरवून करेक्ट कार्यक्रम झाला?

जिल्हा बँक निवडणूकीत शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांना पराभवाचा धक्का बसला आहे.
शशिकांत शिंदेंचा ठरवून करेक्ट कार्यक्रम झाला?
nyandev Ranjane, Shashikant Shindesarkarnama

सातारा : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा बँक निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांना पराभवाचा धक्का बसला आहे. जावली प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघातून त्यांचे विरोधक ज्ञानदेव रांजणे यांना २५ तर शशिकांत शिंदे यांना २४ मते मिळाली. त्यामुळे शिंदे यांचा एका मताने पराभव झाला आहे. आज सकाळी सुरु झालेल्या मतमोजणीत जावळीतून हा धक्कादायक निकाल हाती आला आहे.

निवडणूक जाहीर झाल्यापासूनच जावळी सोसायटी मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत राहिला होता. कारण एकेकाळी संपूर्ण जिल्ह्याची सूत्रे हालवणारे शिंदे आज त्यांच्याच संचालकपदासाठी कडवी लढत देत होते. शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे शशिकांत शिंदे या निवडणूकच्या निमित्ताने जिल्ह्याच्या राजकीय चक्रव्यूहात एकाकी पडलेले पहावयास मिळाले. जिल्ह्यातील मोठे नेते बिनविरोध निवडून गेले असताना शशिकांत शिंदे यांना मात्र केवळ गाफील राहिल्याने निवडणुकीला व पराभवाला सामोरे जावे लागल्याचे दिसून येते.

nyandev Ranjane, Shashikant Shinde
भाजपच्या साथीने राष्ट्रवादीच्या सहकारमंत्र्यांनी उधळला गुलाल

गेल्या १० वर्षापासून शशिकांत शिंदे जावळी मतदारसंघातुन संचालक म्हणून निवडून जात होते. यावेळी मात्र त्यांना जावळीतील सर्वसामान्य समजले जाणारे उमेदवार व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे कट्टर समर्थक ज्ञानदेव रांजणे यांनी कडवे आव्हान उभे करत पराभूत केले. ४९ मतदारांपैकी २८ मतदार हे रांजणे यांच्या विचाराने प्रभावित झाल्याने आमदार शिंदे यांच्या अडचणीत वाढ झालेली पहावयास मिळाली.

दिड महिन्यापासून जावळीतील बहुतांशी मतदार हे सहलीवर गेल्याने शिंदे यांची खऱ्या अर्थाने गोची झाली. मतदारांशी शेवटच्या दिवसापर्यंत भेटच होऊ न शकल्याने शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सुरुवातीपासून आमदार शिंदे यांना ही निवडणूक जड जाणार असल्याच्या चर्चेने व रांजणे यांच्या बाजूने एकतर्फी निवडणूक होणार असल्याचा अटकळ बांधली जात होती.

nyandev Ranjane, Shashikant Shinde
सातारा जिल्हा बँक निवडणूकीत शशिकांत शिंदेंना पराभवाचा धक्का

पण शेवटपर्यंत एकतर्फी वाटणारी ही निवडणूक मतदानादिवशी मात्र अटीतटीची ठरली. आमदार शिंदे यांनीही आपले राजकीय डावपेच दाखवून देत निकाल फिरवण्यापर्यंत मजल मारली, मात्र त्यात त्यांना अपयश आले. केवळ एक मताने त्याना पराभव स्वीकार करावा लागला. एकूण ४९ मतदार असल्याने विजयासाठी २५ हा मॅजिक आकडा गाठणे गरजेचे होते. त्यात आमदार शिंदे यांना २४ तर ज्ञानदेव रांजणे याना २५ मते मिळाली.

निकालानंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक :

दरम्यान हा निकाल शिंदे आणि कार्यकत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या निकालानंतर शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनी सातारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली. पण त्यानंतर या दगडफेकी बद्दल खेद व्यक्त करत शशिकांत शिंदे यांनी माफी मागितली आहे.

दरम्यान, या पराभवामागे मोठं कारस्थान असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला आहे. कार्यकर्त्यांनी भावनेच्या भरात हे केलं, हे योग्य नाही. मी सर्वांची माफी मागतो,'' असंही शशिकांत शिंदे यांनी म्हटलं.

nyandev Ranjane, Shashikant Shinde
आमदार शिंदेंनी मागितली माफी, पराभवामागे मोठे षडयंत्र

या निवडणुकीत शशिकांत शिंदेना विजयी करा, असा निरोप खुद्द शरद पवार व अजित पवार त्यांनी जिल्ह्यातील मातब्बर श्रेष्ठींनी पाठविला होता. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांचाही निरोप प्रमाण न मानता शशिकांत शिंदे यांना पाडण्याचे काम राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी केल्याचा आरोप शिंदे समर्थकांनी केला. हा पराभव आपल्याच लोकांनी केल्याचे सांगत सुमारे १५ ते २० कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी भवनावर तुफान दगडफेक केली.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in