शशीकांत शिंदेंच्या ओठी अखेर ते नाव आलेच...

आमदार शिंदे Shashikant shinde म्हणाले, ''पक्षासाठी मी कुणालाही अंगावर घेतो हा माझा दोष आहे. जावलीची Jawali जनता कोणाच्या मागे आहेत हे कळेलच.
Shashikant shinde, Sharad pawar, shivendraraje Bhosale
Shashikant shinde, Sharad pawar, shivendraraje Bhosalesarkarnama

सातारा : ''शिवेंद्रसिंहराजे भोसले कोणत्या पक्षात आहेत, हे पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मला एकदा सांगावं. म्हणजे पुढच्या काळात कोणत्या तालुक्यात पक्ष कसा वाढवायचा हे ठरवता येईल,'' असा इशारा आमदार शशीकांत शिंदे यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना व आमदार शिवेंद्रसिंहराजेंना दिला आहे.

जिल्हा बँक निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांच्या झालेल्या पराभवामुळं त्यांचे समर्थक कमालीचे आक्रमक झाले असून त्यांनी थेट पक्षाच्या कार्यालयावरच दगडफेक केली. शिंदे समर्थकांनी थेट पक्षालाच आव्हान दिल्याचं बोललं जात असताना, शिंदे यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, ''पक्षासाठी मी कुणालाही अंगावर घेतो हा माझा दोष आहे. जावलीची जनता कोणाच्या मागे आहेत हे कळेलच. शिवेंद्रसिंहराजे भोसले कोणत्या पक्षात आहेत हे पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मला एकदा सांगावं, म्हणजे पुढच्या काळात कोणत्या तालुक्यात पक्ष कसा वाढवायचा हे ठरवता येईल.''

Shashikant shinde, Sharad pawar, shivendraraje Bhosale
शेखर गोरेंचे नशीब जोरात चिट्ठीवर गेले जिल्हा बॅंकेत

राष्ट्रवादी भवनावर शिंदे समर्थकांनी केलेल्या दगडफेकीच्या घटनेबद्दल विचारले असता आमदार शिंदे म्हणाले, ''माझ्या कार्यकर्त्यांकडून भावनेच्या भरात चूक झाली आहे. त्याबद्दल मी पवार साहेबांची माफी मागतो, पण माझ्या विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न किती झाले याबद्दल मला शंका आहे. त्यामुळं येत्या काळात राष्ट्रवादीतंर्गत संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत.

Shashikant shinde, Sharad pawar, shivendraraje Bhosale
पाटणकर ठरले 'जायंट किलर'; गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा पराभव

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते. मात्र, पक्षाचेच बंडखोर उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांच्यामुळं त्यांना एका मतानं पराभव पत्करावा लागला. त्यामुळं संतापलेल्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक केली. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून शिंदे यांना मदत झाली नसल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. शशिकांत शिंदे यांनी मात्र ही सगळी चर्चा फेटाळून लावली.

Shashikant shinde, Sharad pawar, shivendraraje Bhosale
शशिकांत शिंदेंना धूळ चारणारे ज्ञानदेव रांजणे आहेत तरी कोण?

''राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार साहेबांमुळंच माझी राजकीय ओळख आहे. कालच्या निवडणुकीत स्वत: शरद पवार साहेबांनी आणि अजितदादांनी माझ्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, काही गोष्टी वेगळ्या घडल्या. आम्ही गाफील राहिलो, त्याचा फटका बसला,' असेही शिंदे म्हणाले.''कार्यकर्त्यांकडून भावनेच्या भरात चुकीचं कृत्य झालं आहे. त्याबद्दल मी पक्षाच्या सर्व नेत्यांची दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो, असंही शिंदे म्हणाले.

Shashikant shinde, Sharad pawar, shivendraraje Bhosale
संघर्ष मला नवीन नाही, कोणालाही घाबरु नका : शिवेंद्रसिंहराजे

‘शरद पवारांसाठी मी जीव देईन’

‘मी पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे हे शरद पवार साहेबांना माहीत आहे. एकनिष्ठ आहे, मी त्यांच्यासाठी जीव देईन. त्यामुळं कार्यकर्त्यांनी कुठलीही चुकीची भूमिका घेऊ नये, असं आवाहन शिंदे यांनी केलं. ''अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीत माझं नाव निश्चित झालं होतं. मतदारांचा आकडाही मी समोर ठेवला होता. रामराजे निंबाळकर हे देखील बैठकीला होते. त्यांनी माझ्या विजयासाठी प्रयत्न केले, पण ते किती प्रामाणिक होते माहीत नाही. माझ्या पराभवामागे मोठं कारस्थान आहे. येत्या काळात ते समोर येईलच,'' असंही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com